शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

मराठीच्या प्रसारात इन्स्क्रीप्ट कीबोर्ड महत्त्वाची भूमिका बजावेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 1:50 PM

भारतात एकच स्टँडर्ड स्वीकारले न गेल्यामुळे आपल्याकडच्या मुद्रणव्यवसायाला फटका बसला. ज्या वेगाने मुद्रणक्षेत्र वाढायला हवे होते त्या वेगाने ते वाढले नाही. 

मुंबई: १९८९ साली सी-डॅकने इन्स्क्रीप्टची निर्मिती केली. संगणकावर मराठी टंकलेखन करणं सोपं जावं यासाठी वर्णाक्षरमालेप्रमाणे की-बोर्डवर त्याची रचना करण्यात आली होती. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडून हा कीबोर्ड प्रमाणितही करुन घेण्यात आला. देशभरात इन्स्क्रीप्टपूर्वी मात्र ओल्ड टाइपरायटर हा कीबोर्ड वापरला जाई. त्यामुळे ज्या लोकांना टंकमुद्रण यायचे त्यांना तो ओल्ड टाइपरायटर वापरणं सोपं जाई. मात्र, बाकीच्या नवख्या मुलांना तो शिकायला ६ महिने जायचे. इन्स्क्रीप्टने त्यामध्ये क्रांती केली. केवळ २ दिवसांच्या वापराने त्यावर हात बसू शकत होता आणि तो लगेच वापरायला सुरुवात करता येत होती.संगणकावर टंकलेखन करताना वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरली जातात. त्यांच्या स्टोरेजपद्धती वेगवेगळ्या असतात. या स्टोरेजच्या म्हणजे माहिती साठवण्याच्या पद्धती कंपनीनुसार वेगवेगळ्या असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास श्री लीपीमध्ये तुम्ही टाइप केलं असेल आणि तुम्ही ज्याला ती माहिती पाठवली आहे त्याच्या संगणकावरील स्टोरेजची पद्धती वेगळी असेल तर त्याच्याकडे ते वाचता येणार नाही. सी-डॅकने इन्स्क्रीप्टसाठी साधंसोपं असं स्टोरेजकोड तयार केला आणि त्याचं १९९१ साली बीआयएस रजिस्ट्रेशन झालं. त्याचा वापर भारतीय भाषांचा प्रसार करण्यासाठी झाला असता. सरकारने भारतीय कंपन्यांना ते वापरण्यासाठी दिलं असतं तर आजच चित्र वेगळं दिसलं असतं. मात्र चीन, जपान आणि कोरिया यांनी एकच स्टँडर्ड वापरुन संगणकावरची लिपी स्वीकारली. भाषा वेगवेगळ्या आणि राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्या तरीही त्यांनी केवळ लिपीमुळे एकत्र येत एकच स्टँडर्ड स्वीकारले. तसेच अरेबिक, फारसी, उर्दू यांनीही एकच स्टँडर्ड स्वीकारले. मात्र, भारतात एकच स्टँडर्ड स्वीकारले न गेल्यामुळे आपल्याकडच्या मुद्रणव्यवसायाला फटका बसला. ज्या वेगाने मुद्रणक्षेत्र वाढायला हवे होते त्या वेगाने ते वाढले नाही. १९९५ साली इंटरनेटच्या प्रसारानंतर नव्या कोडची गरज निर्माण झाली. त्यावेळेस नव्याने तयार झालेल्या युनिकोडने मात्र या परिस्थितीमध्ये क्रांती झाली. युनिकोड हा युनिवर्सल कोड आहे. संगणकात एखादी माहिती टंकलिखित केली की ती कशा पद्धतीने साठवाची ती स्टोरेज करण्यासाठी एक कोड वापरावा लागतो. युनिकोड ही पद्धती जगभरात सर्वत्र चालते.त्यांनी बीआयएसचे स्टँडर्डस तपासले आणि त्यांना ते उत्तम असल्याचे आढळून आले. त्यामुळेच इन्स्क्रीप्टचं स्टोरेज कोड हे युनिकोड हेच असल्यामुळे ते वापरण्यासाठी सोपं आणि भारतीय भाषांच्या प्रसारासाठी उत्तम आहे. यामुळे कोणत्याही सिस्टमवर त्यामध्ये टंकलिखित केलेली अक्षरे वाचली जाऊ शकतात.इन्स्क्रीप्टचा वापर १९९१ रोजी पासून आपण इन्स्क्रीप्ट सुरु केलं असतं तर आज आपण मोठा टप्पा गाठला असता. चीनमध्ये इंटरनेट, संगणकाचा प्रसार भारतापेक्षा तुलनेत उशिरा झाला मात्र त्यांनी एकच सोपे स्टँडर्ड वापरल्यामुळे ते मुद्रण आणि भाषाक्षेत्राच्या विकासात आपल्या कित्येक मैल पुढे आहेत. भारताने प्रादेशिक भाषांच्या विकासाकडे लक्ष देण्याऐवजी इंग्रजीकडे लक्ष जास्त दिले किंबहुना त्याचा आग्रहच धरुन बसलो. चीनने इंग्रजीपेक्षा स्वतःच्या भाषेला संगणकावर आणले आणि त्यांच्या भाषा सुरक्षित राहिल्या आहेत. भारतात मराठी संगणकावर वापरण्यात अडथळे येताना दिसले की लगेच थांबा! मराठी कशाला शिकता त्यापेक्षा इंग्लिशच शिका! असं धोरण राज्यकर्त्यांनी वापरले. आता तरी चूक लक्षात घेऊन आपण इन्स्क्रीप्टचा वापर सुरु केला पाहिजे.

(लेखक लीना मेहेंदळे या माजी सनदी अधिकारी आहेत.) 

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018Internetइंटरनेट