शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

कुर्ला नेहरूनगरमधील अल्पवयीन मुलीच्या मारहाण प्रकरणात पोलिसांची चौकशी करा- आ. डॉ. नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 9:05 PM

मुंबई : कुर्ला नेहरूनगर परिसरातील मारहाण पीडित मुलगी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचा दाखला व जबाब कोर्टात सादर करण्यात पोलिसांनी दिरंगाई केली.

मुंबई : कुर्ला नेहरूनगर परिसरातील मारहाण पीडित मुलगी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचा दाखला व जबाब कोर्टात सादर करण्यात पोलिसांनी दिरंगाई केली. याबाबत सखोल चौकशी करावी आणि या घटनेची क्लिप समाजाने वाहिन्यांवरून पाहिली असताना या घटनेबाबत जामीन देत असल्याचा निकाल कोर्टाने दिल्याने या मुलीची  बाजू कोर्टात व्यवस्थित न मांडल्याने त्याच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.कुर्ला नेहरूनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीला मारहाण व विनयभंग केल्याची घटना १७ ऑक्टोबर २०१७ रोजी घडली होती. सदर गुन्हा क्रमांक २१७/ २०१७ मध्ये अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपर्डे यांच्याकडून सदर केसचा तपास काढून घेऊन टिळकनगर येथील महिला पोलीस निरीक्षक मनीषा शिर्के यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र सदर केस हाताळत असताना या कुटुंबाला पोलीस यंत्रणेकडून वारंवार चुकीची माहिती या मुलीच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचे दिसून आले आहे.  या मुलीचा १६४ अन्वये जबाब घेण्यात आला होता. या घटनेत आरोपीवर पोक्सो कायदा लागू करण्यात आलेला आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे. मात्र याची दखल या केसमध्ये न घेता ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी सेक्शन कोर्ट - ४० येथे सदर आरोपीस हजर केले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आला.  आ. डॉ. गोऱ्हे यांनी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली असता आम्ही योग्य पद्धतीने बाजू मांडली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र या केसचे काम पाहणाऱ्या सरकारी वकिलांनी काय भूमिका मांडली याबाबत पोलिसांना स्पष्ट सांगता आलेले नाही. आरोपीला त्याच्या राहत्या भागात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र आरोपी व पीडित मुलगी एकाच इमारतीमध्ये राहत असल्याने हे कसे शक्य होणार याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. पीडित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांना आरोपीचे नातेवाईक वारंवार त्रास देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून देऊनसुद्धा त्यांच्यावर कारवाई का होत नाही, याची सखोल चौकशी करण्यात यावी. आरोपीस मिळालेल्या जामिनाच्या विरोधात उच्चस्तरीय कोर्टात अपील करून जामीन रद्द करण्याची मागणी करावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. या मुलीला सध्या एका रुग्णालयात दाखल केले असून तिथे तिला कोणतेही पोलीस संरक्षण देण्यात आलेले नाही. याकडे आ. डॉ. गो-हे यांनी पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. लोकप्रतिनिधी व मुलीच्या कुटुंबीयांना वेगवेगळी माहिती पोलिसांनी का दिली, या केसची आवश्यक कागदपत्रे कोर्टात उशिरा सादर का करण्यात आली ?, मुलीच्या कुटुंबीयांना अद्यापही धमक्या येत आहेत, यावर कोणती कार्यवाही करणार अशी विचारणा या निवेदनात त्यांनी केली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliceपोलिस