शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रारंभ दणक्यात परंतु वाट बिकट

By admin | Updated: September 18, 2014 01:49 IST

काँग्रेस अजून सुस्तच असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र कोल्हापुरात मंगळवारी प्रचार प्रारंभाची धडाक्यात जाहीर सभा घेवून शक्तीप्रदर्शन केले.

विश्वास पाटील - कोल्हापूर
महायुतीचा जागा वाटपाचा गुंता सुटण्याऐवजी वाढत चालला असताना व काँग्रेस अजून सुस्तच असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र कोल्हापुरात मंगळवारी प्रचार प्रारंभाची धडाक्यात जाहीर सभा घेवून शक्तीप्रदर्शन केले. पुन्हा राष्ट्रवादीचा नारा पक्षाने दिला असला तरी पश्चिम महाराष्ट्रातील वास्तव मात्र तसे नाही. या बालेकिल्ल्यातीलच पक्षाची वाट बिकट आहे. 
कोल्हापुरातील या दणदणीत सभेने दोन-तीन गोष्टी प्रकर्षाने पुढे आल्या. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी सगळ्य़ाच प्रसारमाध्यमांबद्दल फार जागरूक झाल्याचे दिसले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्या चिडखोर स्वभावाला मुरूड घातली असून येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तर पवार फारच दिलखुलास मुडमध्ये दिसले. अडचणीच्या प्रश्र्नांवरही त्यांनी कोणता नवा वाद तयार होणार नाही, अशी सावध उत्तरे दिली. प्रचार प्रारंभ सभेचेही नियोजन नेटके केले. या सभेचे थेट प्रक्षेपण होईल अशी व्यवस्था केली होती. ‘राष्ट्रवादी’च्या आतार्पयतच्या कोणत्याच सभा थेट प्रक्षेपित झालेल्या नव्हत्या. बहुधा असे प्रक्षेपण होणार असल्यामुळेच पक्षाने ताकद लावून गर्दीही जमवली होती. एकेकाळी पवार यांची सभा म्हटल्यावर मिळेल ते वाहन पकडून ग्रामीण भागातील शेतकरी, कार्यकर्ते, तरुण मोठय़ा संख्येने येत होते. तीन-तीन तास त्यांच्या भाषणासाठी प्रतिक्षा करत होते. परंतु तो काळ आता इतिहास जमा झाला आहे. त्यामुळे माणसे वाहने भरून आणावीच लागतात व राष्ट्रवादीने तेच केले होते. सभेत पवार व अन्य कोणत्याही नेत्यांपेक्षा गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या भाषणाला जास्त प्रतिसाद मिळाला. सर्व नेत्यांनी भाषणात पवार यांचा उल्लेख जेव्हा-जेव्हा केला तेव्हा एकदाही टाळ्या वाजल्या नाहीत. मात्र अजित पवार व्यासपीठावर आल्यावर जोरदार जल्लोष झाला.
या सभेत बोलताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नव्या चेह:यांना संधी देण्याची भाषा केली. परंतू वास्तव त्यापेक्षा वेगळेच आहे. कारण निवडून येण्याची क्षमता या निकषावर विद्यमान आमदारांनाच संधी देण्यात येणार असल्याने नवे चेहरे येणार कसे हा प्रश्नच आहे. पवार व अन्य नेत्यांनी मांडलेले मुद्देही फार नवे व मतदारांना आकर्षित करणारे नव्हते. गेल्या पाच वर्षात कोल्हापूरातील टोलसारखे जे विषय सोडविणो शक्य होते, ते लोंबकळत ठेवले व आता पुन्हा सत्ता द्या आम्ही तेच विषय शंभर दिवसांत सोडवितो, असे पोकळ आश्वासन पुन्हा देण्यात आले. 
 
जातीयवादी शक्तींना नेस्तनाबूत करण्याची हाक शरद पवार यांनी दिली. ती त्यांनी लोकसभेलाही दिली होती व यामागील सर्वच निवडणुकीत ते देत आले आहेत. या सभेत काँग्रेसवर मात्र त्यांनी जाणीवपूर्वक टीका टाळली. काँग्रेसची कुणीच फारशी दखल घेतली नाही. शिवसेना व त्यातही जास्त भाजपावरच टीकेचा रोख जास्त होता, तो स्वाभाविकही आहे. कारण तोच आता उर्वरित तिन्ही प्रमुख पक्षांचा अजेंडय़ावरील क्रमांक एकचा राजकीय शत्रू आहे. 
 
ठाकरे कुटुंबिय जसे वृत्तपत्रंतील बातम्यांची कात्रणो दाखवून बोलतात तसे छगन भुजबळ यांनीही भाषण केले. त्यांच्या भाषणात जरुर जोर होता परंतु या पक्षाच्या नेत्यांवर गेल्या पाच वर्षात जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्याचे उत्तर कोणत्याच कात्रणात नव्हते.