सरकारच्या सर्व विभागांची माहिती एका क्लिकवर मिळणार, 'सीएम डॅश बोर्ड' आणि 'स्वॅस' माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:59 IST2025-03-11T18:58:33+5:302025-03-11T18:59:07+5:30
CM Dash Board News: सरकारच्या सर्व विभागांची माहिती आता जनतेला फक्त एका क्लिकवर 'सीएम डॅश बोर्डवर' लवकरच उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सीएम डॅश बोर्ड' संकेतस्थळ आणि 'स्वॅस' माहिती प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे.

सरकारच्या सर्व विभागांची माहिती एका क्लिकवर मिळणार, 'सीएम डॅश बोर्ड' आणि 'स्वॅस' माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई - सरकारच्या सर्व विभागांची माहिती आता जनतेला फक्त एका क्लिकवर 'सीएम डॅश बोर्डवर' लवकरच उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सीएम डॅश बोर्ड' संकेतस्थळ आणि 'स्वॅस' माहिती प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यामध्ये न्यायालय, रेरा तसेच कायदा आणि सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, 'स्वॅस' (S३WaaS) या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये ३४ विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबर सरकारच्या सर्व विभागांचाही लवकर समावेश करावा, असे आदेश दिले.
विधानभवन येथे आज सीएम डॅशबोर्ड सादरीकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह आयटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,जनतेला कोणत्याही योजनांची माहिती तात्काळ एकाच संकेतस्थळावर मिळावी यासाठी सीएम डॅश बोर्ड जनतेला उपयुक्त ठरावा. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती आणि सद्यस्थिती, अद्ययावत माहिती, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये. यामध्ये न्यायालय, कायदा व सुव्यवस्था तसेच रेराची देखील माहिती असावी. https:// cmdashboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे. हे संकेतस्थळ दिव्यांगानाही सहज हाताळता येणार असून, माहितीचा अधिकार देखील यावर उपलब्ध असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान विभागातंर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राची 'स्वॅस'(S३WaaS) ही प्रणाली आहे.या प्रणालीमध्ये राज्यातील ३४ संकेतस्थळांचा समावेश आहे यामध्ये इतर विभागांच्या संकेतस्थळांचाही समावेश वाढवा.ही प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्ट फोन व संगणकावरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे.