शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Indrajit Sawant: 'तुझ्या घरात येऊन मारेन, हा शेवटचा कॉल'; इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:13 IST

Indrajit Sawant Threat News: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना एका व्यक्तीने कॉल करून मारण्याची धमकी दिली आहे. सावंत यांनी संभाषणाची रेकॉर्डिंग शेअर करत याबद्दल माहिती दिली. 

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका व्यक्तीने कॉल करून धमकी दिल्याची माहिती इंद्रजीत सावंत यांनी दिली. हा व्यक्ती नागपूर येथील प्रशांत कोरटकर असल्याचेही त्यांनी सांगितले. जी रेकॉर्डिंग सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, त्यात धमकी देणारा व्यक्ती अर्वाच्य शिवीगाळ करत घरी येऊन मारण्याची धमकी देत आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ब्राह्मणांबद्दल द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत या व्यक्तीने इंद्रजीत सावंतांना शिवीगाळ केली. प्रशांत कोरटकर असं नाव या व्यक्तीने संभाषणादरम्यान सांगितले. त्याचबरोबर माझे नाव गुगलवर शोध. ब्राह्मणांना हलक्यात घेऊन नको. ब्राह्मणांची ओकात दाखवून देऊ. जिथे बोलवशील तिथे येऊ, येतो. तुझ्या घरात येऊन मारेन, असे धमकी देणारी व्यक्ती म्हणत आहे. 

इंद्रजीत सावंत काय बोलले?

"मा.मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राम्हण  धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहित पण या हरामखोरांचे शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत,यांच्या पोटात श्री शिव छत्रपतीं बद्दल काय विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकार्डिंग व्हायरल करत आहे. या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षूकालाच काय यांच्या बापाला ही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही", असे इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे. 

प्रशांत कोरटकर काय म्हणाले?

"मला सकाळी कॉल आले की, माझ्या आवाजात कुणीतरी सावंत यांना धमकी दिली आहे. पहिली गोष्ट तर २५ वर्षांपासून पत्रकारिता करतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असो, इतिहास असो याचा मी अभ्यास केलेला आहे. यापूर्वी इतकी जबाबदार पत्रकारिता केल्यानंतर असं मी कुणाला फोनवर धमकी देईल?", असे प्रशांत कोरटकर म्हणाले. 

"माझं नाव वापरून कुणीतरी फोन केला. अशा प्रकारची धमकी देण्याचा प्रश्नच नाहीये. बाष्कळ धमकी देण्याचा माझा पायंडा नाही. त्यांनी ती गोष्ट माझ्याशी शहानिशा करून टाकली असती, तर बरं झालं असतं. तुम्हाला माहितीये की हल्ली एआय करून आवाजाचे मार्फिंग केले जाते. माझ्याबद्दल द्वेष बाळगणाऱ्याने हा केलेला प्रकार आहे. मी पोलिसांत तक्रार आहे की, कोणी माझ्या आवाजाची नक्कल केली आहे", असे प्रशांत कोरटकर यांनी सांगितले. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजcyber crimeसायबर क्राइम