शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:00 IST

BJP vs Sharad Pawar BCP, Politics over India Pakistan Conflict: भाजपा मिडियाकडून एक पोस्ट करण्यात आल्याने विरोधक संतापले

BJP vs Sharad Pawar BCP, Politics over India Pakistan Conflict: भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर केले. त्यात दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच, सुमारे १०० दहशतवादीही मारले गेले. इतका मोठा धक्का देऊनही पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत. गेले २ दिवस अंधार पडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून भारताच्या सीमेलगतच्या भागांना लक्ष्य केले जात आहे. भारताकडून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकत्रितपणे देशासाठी ठाम उभे आहेत. अशातच भाजपाच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे शरद पवार गटाकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सीमेवर किंवा देशात जेव्हा दहशतवादी हल्ले झाले तेव्हा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पण काँग्रेसच्या मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्यानंतरही, आपल्याकडून काहीच करण्यात आले  नाही, असा दावा भाजपाने केला आहे. त्यासह २०१४ ते २०२५ मधील विविध हल्ले आणि त्यावर पंतप्रधान मोदी यांनी दिलेले प्रत्युत्तर याबद्दलची पोस्ट केली आहे. यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, @BJP4India हे जे काही करत आहे ते आपल्याला पटते आहे का? देश संकटात असताना सर्व जण पक्ष, राजकारण बाजूला ठेवून एकसंध उभे आहेत. हे भाजपला बघवत नाही का? भारतीय सैन्याचे जवान आपल्या प्राणांची बाजी लावून पाकिस्तान विरोधात लढत आहेत. अशा परिस्थितीत भाजप असे राजकारण करत असेल तर याने देशाच्या एकजुटीवर फरक तर पडेलच शिवाय सैन्याच्या मनोबलावरही परिणाम होईल. त्यामुळे आपल्या ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा," असे रोहिणी खडसे यांनी लिहिले आहे.

दरम्यान, विरोधी पक्षातील आणखीही काही नेतेमंडळींनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohini Khadseरोहिणी खडसे