जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारे उपांत्य फेरीत...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 17:47 IST2019-09-21T16:00:31+5:302019-09-21T17:47:22+5:30

राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

India confirm another medal in World Wrestling Championship.! Rahul Aaware in the semifinals | जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारे उपांत्य फेरीत...!

जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारे उपांत्य फेरीत...!

ठळक मुद्देकझाखस्तानमधील नूर सुलतान येथे स्पर्धा आहे सुरू

पुणे :भारताचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे उपांत्य फेरीत धडक दिली आहे. 
कझाखस्तानमधील नूर सुलतान येथे ही स्पर्धा सुरू आहे. राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या राहुलने फ्री स्टाईल प्रकारातील ६१ किलो वजन गटात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान कझाखस्तानचा मल्ल आर. कलियेव्ह याच्यावर १०-७ अशा फरकाने सरशी साधली.
पहिल्याच मिनिटाला राहुल ०-२ असा माघारला होता. मात्र त्याने लगेच ही पिछाडी भरून काढत ३-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. यामुळे दुसऱ्या फेरीअखेर राहुलला ६-५ अशी एकाच गुणाची आघाडी घेता आली.
तिसऱ्या फेरीत राहुलने चपळाईने गुण वसूल करीत आपली आघाडी १०-६ अशा फरकावर नेऊन ठेवली. अखेरच्या क्षणी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही कलियेव्हला एकच गुण मिळवता आला. परिणामत:, १०-७ अशा गुणांनी बाजी मारत राहुल अंतिम ४ खेळाडूंत आपले स्थान निश्चित केले.
तत्पूर्वी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत राहुलने तुर्कमेमिस्तानचा खेळाडू करीम होजाकेव्ह याचा १३-२ ने धुव्वा उडविला होता. या प्रकारात राहुलकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. आता उपांत्य फेरीत राहुलसमोर जॉर्जियाच्या बेका लोमताझ याचे आव्हान असेल.

Web Title: India confirm another medal in World Wrestling Championship.! Rahul Aaware in the semifinals