an independent development corporation for konkan demands bjp leader pravin darekar | ठाकरे सरकारचे कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम; प्रवीण दरेकर यांची टीका

ठाकरे सरकारचे कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम; प्रवीण दरेकर यांची टीका

ठळक मुद्देप्रवीण दरेकर यांची महाविकास आघाडी सरकारवर टीकाकोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणीराज ठाकरे यांच्या पत्राचे प्रवीण दरेकरांकडून स्वागत

मुंबई : भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळाच्या मुद्यावरून आरोप-प्रत्योरापांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या महामंडळांच्या मुद्यावरून राजकारण तापले असताना प्रवीण दरेकर यांनी कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी केली आहे. (an independent development corporation for konkan demands bjp leader pravin darekar)

कोकणाला संपूर्ण महाराष्ट्र विकास महामंडळातून वगळून कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी करत कोकणाने आतापर्यंत भरभरून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणाचे आहेत. शिवसेनेलाही कोकणाने खूप दिले आहे. आता कोकणाची परतफेड करण्याची वेळ आली आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

राज्यातील ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ: अजित पवार

कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम

कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. कोकणाला काही मिळाले नाही, तर ठाकरे सरकारचे कोकणासाठी हे पुतना मावशीचे प्रेम म्हणावे लागेल, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना केली. शिवसेना आता फक्त मुंबई आणि कोकणपुरतीच आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

नाणार प्रकल्पात आडकाठी करू नये

नाणार प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, यासंदर्भात भाष्य करताना प्रवीण दरेकर म्हणाले की, नाणारमुळे कोकणाचा मोठा विकास होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आडकाठी करू नये. मोठा रोजगार उपलब्ध होणार असेल, तर त्यांनी आपली भूमिका बदलावी, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राचे स्वागत केले आहे. 

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी'सारखा प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: an independent development corporation for konkan demands bjp leader pravin darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.