शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार पीडितांचे वाढतेय ‘मनोधैर्य’

By admin | Updated: September 16, 2014 00:24 IST

राज्यात दररोज एका महिलेवर, तर दोन बालकांवर अत्याचार होत असल्याची भयानक आकडेवारी महिला व बालविकास विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

पुणो :  राज्यात दररोज एका महिलेवर, तर दोन बालकांवर अत्याचार होत असल्याची भयानक आकडेवारी महिला व बालविकास विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. पीडित व्यक्तींना पुन्हा उभे करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेच्या आकडेवारीनुसार हे विदारक सत्य समोर आले आहे. 
बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पीडितांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गुन्हेगारी क्षती साहाय्य व पुनर्वसन मंडळ स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारची घटना घडल्यावर पोलीस प्रशासनाकडून या समितीला माहिती देण्यात येते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक होते. त्यानंतर संबंधित पीडितांना आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेसाठी राज्यातून 1 हजार 6क्1 अर्ज आले होते. त्यातील 452  पीडितांचे अर्ज तांत्रिक कारणाने बाद झाले असून, 1 हजार 149 पीडितांना त्याचा लाभ मिळाला आहे. 
पीडित झालेल्या महिला व बालकांना मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी तातडीने आर्थिक मदत आणि मानसोपचारतज्ज्ञाची सेवा उपलब्ध करून देण्यात येते. मनोधैर्य योजनेनुसार अॅसिड हल्ल्यात जखमी मुलीला 5क् हजार रुपये, तर चेहरा विद्रूप झाल्यास तीन लाख रुपयांची मदत देण्यात येते. तर, बालकांवरील लैंगिक अत्याचार व बलात्कार या घटनांमध्ये दोन लाख, तर गंभीर प्रकरणांमध्ये तीन लाख रुपयांची मदत करण्यात येते. राज्यात घडलेल्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये पीडित झालेल्या 1 हजार 149 जणांना मदत करण्यात आली आहे. यात 415 महिला व 734 बालकांचा समावेश आहे. यावरून बालकांवर अत्याचार होत असल्याचे पुढे आले आहे. महिला व बाल कल्याण विभागाचे उपआयुक्त  डी. व्ही. हिवराळे  म्हणाले, की मनोधैर्य योजनेमुळे पीडित महिलांना आधार देणो शक्य झाले आहे. पूर्वी अत्याचारीत व्यक्ती पुढे येत नसे, मात्र यात बदल झाला आहे. गेल्या वर्षभरात जवळपास 15 कोटींपेक्षा अधिक रक्कम पीडित महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी दिली आहे.(प्रतिनिधी)
 
ठाणो जिल्ह्यात सर्वाधिक अत्याचाराच्या 272 घटना घडल्या आहेत. पाठोपाठ मुंबई उपनगरमध्ये 87, चंद्रपूर 48, साता:यात 45, पुणो 42, औरंगाबाद 44, नाशिक 39, सोलापूर 37 व बुलडाण्यात 35 घटना घडल्या आहेत. तर, सर्वात कमी घटनांची नोंद अकोला 7, नंदुरबार 9, नगर व जालन्यात प्रत्येकी 11 अशी झाली आहे.