राष्ट्रवादीत इनकमिंग; प्रवेशावेळीच अजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:37 IST2025-01-24T14:37:09+5:302025-01-24T14:37:26+5:30

जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे. आता त्यांच्या समस्या सोडवण्याची आपली जबाबदारी आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. 

Incoming to NCP Ajit Pawar gave advice to the workers at the time of entry | राष्ट्रवादीत इनकमिंग; प्रवेशावेळीच अजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

राष्ट्रवादीत इनकमिंग; प्रवेशावेळीच अजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

NCP Ajit Pawar: नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातील सुमारे ५० गावातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. 

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा. निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात. त्यामुळे लक्षपूर्वक काम करा," असं आवाहन अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे.

शिबीरामध्ये जनमानसात प्रतिमा चांगली असेल असा विचार मांडला होता त्यानुसारच पक्षात नवीन कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नांदेड जिल्ह्यात आणि शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य पक्षाकडून आणि सरकारकडून केले जाईल, असं आश्वासनही अजित पवार यांनी दिलं आहे. 

"राष्ट्रवादीकडून सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त सर्व घटकातील लोक कसे सहभागी होतील याकडे लक्ष द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेला चांगले यश मिळालं आहे. जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे. आता आपली जबाबदारी त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत," असेही अजित पवार यावेळी म्हणाले. 

दरम्यान, "पक्षाचे कार्यकर्ते कामात हालते ठेवले पाहिजे, त्या पद्धतीने पक्षाकडून कामाचे स्वरूप तयार केले जाणार आहे. तसे कार्यक्रमही दिले जाणार आहे. आम्ही फक्त राजकारणच करत नाही तर सर्व घटकांच्या काय समस्या आहेत, हेही जाणून घेत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना तुम्हाला आगीतून फोफाट्यात पडल्याची भावना कधीही येऊ देणार नाही," असं विश्वासही अजित पवार यांनी दिलं आहे.

Web Title: Incoming to NCP Ajit Pawar gave advice to the workers at the time of entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.