शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

राडारोडा व जलपर्णीमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:39 IST

पावसाचा जोर वाढल्यानंतर नद्यांमधील पाण्याची वाढलेली पातळी, खडकवासला धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वाहून आलेल्या जलपर्णी आणि राडारोडा यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे : पावसाचा जोर वाढल्यानंतर नद्यांमधील पाण्याची वाढलेली पातळी, खडकवासला धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वाहून आलेल्या जलपर्णी आणि राडारोडा यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डास आणि माश्यांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून नोंदवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील संसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे.शहराचा मोठा भाग व्यापलेल्या मुळा-मुठा नदीच्या पात्रात वाढलेल्या राडारोड्यामध्ये डासांची उत्पत्ती वाढली आहे. पाण्यामध्ये वाढलेली जलपर्णी, कचरा यामुळे डास मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहराच्या हद्दीत खराडी, वारजे- माळवाडी, औंध, बोपोडी, पेठांचा भाग, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, संगमवाडी, ढोलेपाटील रोड, कल्याणीनगर हे भाग नदीच्या जवळच आहे. येथील नागरिक डासांमुळे हैराण झालेले असतानाच त्यांना अनेक आजारांचाही सामना करावा लागत आहे.या परिसरातील डेंगी, मलेरिया, चिकुनगुन्या व हिवतापाच्या रुग्णाची संख्या वाढली आहे. आतापर्यंत पुण्यात डेंगीचे १६१ संशयित रुग्ण सापडले आहेत. यापैकी ४७ रुग्णांना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.आतापर्यंत चिकुनगुनियाचे १७, तर टायफॉईडचे ९ रुग्ण आढळले आहेत. मलेरियाचे ४ तर संसर्गजन्य हिपॅटायटिसचे ७ रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे.स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३५५असून त्यातील ७४ जणांचा आतापर्यंत या आजाराने मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन या नदीपात्राच्या स्वच्छतेकडे कधी लक्षदेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.जलपर्णीमुळे माश्यांचा प्रादुर्भाव1महानगरपालिकेकडून भिडे पूल, सिद्धेश्वर पूल येथील जलपर्णी स्पायडर मशिनच्या साह्याने हटवण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली. खराडी पुलाजवळील जलपर्णी हटवण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. याबाबत कीटक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख कल्पना बळिवंत म्हणाल्या, ‘वाहून आलेल्या जलपर्णीवर डासांची पैदास होत नाही. जलपर्णीबरोबर वाहून आलेला कचरा, अन्नपदार्थ यामुळे डास, माश्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.2मशिनच्या साह्याने बहुतांश जलपर्णी हटवण्यात आल्या आहेत. या जलपर्णीवर आॅरगॅनिक स्प्रे मारल्यावर त्या आकसतात आणि विल्हेवाट लावली जाते. आपल्या भागातील नदी, नाले आदी ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे लक्षात आल्यास नागरिकांनी तातडीने महानगरपालिकेशी संपर्क साधावा.’