शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

Maharashtra Bandh: ‘महाराष्ट्र बंद’ला अनुचित वळण, पुणे, औरंगाबादेत आंदोलक प्रक्षुब्ध, पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 06:29 IST

Maharashtra Bandh : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई, ठाणे वगळता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई, ठाणे वगळता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बाजारपेठा, रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी शाळांना सुटी देण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रत दिवसभर इंटरनेट सेवा बंद ठेवल्याने अफवांना आळा बसला. मात्र उर्वरित ठिकाणी झालेल्या हिंसक घटना, सरकारी कार्यालयांची तोडफोड आणि पोलिसांवरील दगडफेकीमुळे या आंदोलनाला गालबोटही लागले.आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. मुंबई, ठाणे आणि कोकण वगळता इतरत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आणि बंद यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. गेल्या काही दिवसांत आंदोलकांनी एस.टी. बसला टार्गेट केल्यामुळे परिवहन महामंडळाने आज एकही बस रस्त्यावर उतरवली नाही. त्यामुळे आंदोलकांच्या तडाख्यातून एसटी वाचली. पश्चिम महाराष्टÑात बंद शांततेत पार पडला. सर्वपक्षीयांनी बंदचे आवाहन केल्याने अघोषित संचारबंदी लागू केल्यासारखी परिस्थिती होती.अहिंसक मार्गाने बंद पाळण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी केले होते. तशी आचारसंहिताही लागू केली होती. मात्र तरीही बंददरम्यान पुणे, औरंगाबाद येथे हिंसक पडसाद उमटले.>मुंबईतील बाजारपेठा ठप्प : मुंबईतील वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो मराठा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. कोणत्याही हिंसक घटनेविना बहुतेक बाजारपेठा, शाळा व दुकाने बंद असल्याने मुंबई स्तब्ध झाल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.>विदर्भात उत्स्फूर्त बंद : बंदला विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोणतीही अनुचित घटना न घडता बंद शांततेत पार पडला. नागपूरसह अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील बाजारपेठ बंद होती. शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. बुलडाण्यात आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी मुंडन केल. तर नागपुरात रेल्वेरुळावर बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी वेळीच बाजूला केल्याने दुर्घटना टळली.>दोघांची आत्महत्यामराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा व बीड तालुक्यातील पाटेगाव येथे बुधवारी घडल्या.>जिल्हाधिकारी कार्यालयात राडापुण्यात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. चांदणी चौकातही आंदोलकांनी राडा केला.या वेळी झालेल्यादगडफेकीत काही पोलीस जखमी झाले.>औरंगाबादनजीक वाळूजयेथे आंदोलकांनी अनेक वाहने पेटवून दिली.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा