गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण

By यदू जोशी | Updated: November 26, 2025 09:50 IST2025-11-26T09:49:34+5:302025-11-26T09:50:17+5:30

कृषी पंपाच्या विजेपोटी दिली जाणारी सवलत आणि अन्य वीज सवलतींवरील खर्च ४ हजार ५४ कोटी रुपयांनी वाढेल. २०२६-२७ मध्ये हा खर्च १ लाख १५ हजार कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे.

In Maharashtra, Rs 1 lakh crore spent on schemes for the poor; intention of public welfare, but increasing pressure on government exchequer | गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण

गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण

यदु जोशी

मुंबई : गोरगरीब जनतेचे जीवनमान उंचवावे यासाठी राज्य सरकार विविध लोककल्याणकारी योजनांवर थेट लाभ देताना वर्षाकाठी एक लाख कोटी रुपये खर्च करत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत २०२५-२६ या आर्थिक वर्षात १५,३५६ कोटी रुपयांचा अधिक खर्च येणार आहे.

लोककल्याणाचा हेतू साध्य करताना तिजोरीवरील बोजा मात्र वाढत चालला आहे. आठ विभागांमार्फत ज्या योजनांचा थेट लाभ दिला जातो त्यावर २०२४-२५ या आर्थिक वर्षात ८७,५७८ कोटी रुपये खर्च झाले. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या शेवटी हा खर्च १ लाख २९३४ कोटी रुपयांवर जाईल. यंदा लाडकी बहीण योजनेवर २,७९५ कोटी रुपये जादाचा खर्च येणार आहे. कृषी पंपाच्या विजेपोटी दिली जाणारी सवलत आणि अन्य वीज सवलतींवरील खर्च ४ हजार ५४ कोटी रुपयांनी वाढेल. २०२६-२७ मध्ये हा खर्च १ लाख १५ हजार कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे.

हा खर्चही तितकाच महत्त्वाचा : शैक्षणिक संस्थांना दिली जाणारी अनुदाने, विविध समाजघटकांवर होणाऱ्या खर्चाचा त्यात समावेश नाही. राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांचे वेतन, निवृत्तीवेतनावर महिन्याकाठी १२ हजार कोटी तर वर्षाकाठी १ लाख ४४ हजार कोटी रुपये खर्च येतो. पायाभूत सुविधा प्रकल्पांचे जाळे मोठ्या प्रमाणात राज्यात उभे राहत असून त्यावरील खर्चदेखील वाढता आहे. 

कोणत्या कल्याणकारी योजनांवर किती होतो आहे खर्च? (खर्च संख्या कोटी रुपयांत)

योजनेचे नावविभागाचे नाव2024-25 खर्च2025-26 खर्च
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासामाजिक न्याय33,20536,000
संजय गांधी निराधार योजनासामाजिक न्याय2,9473,255
श्रावणबाळ योजनासामाजिक न्याय5,3674,990
मुलींना मोफत शिक्षणउच्च व तंत्रशिक्षण1,5402,141
मोफत वीजऊर्जा16,86120,915
नमो शेतकरीकृषी5,9756,060
पीक विमाकृषी5,8145,000
महात्मा फुले जनआरोग्यसार्वजनिक आरोग्य1,9362,543
आयुष्यमान भारतसार्वजनिक आरोग्य332489
प्रधानमंत्री आवास (शहरी)गृहनिर्माण5661,792
प्रधानमंत्री आवास (ग्रामीण)ग्रामविकास8,10015,137
रमाई आवास योजनासामाजिक न्याय3,8203,500
एसटी महामंडळ सवलत मूल्यपरिवहन

Web Title: In Maharashtra, Rs 1 lakh crore spent on schemes for the poor; intention of public welfare, but increasing pressure on government exchequer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.