आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 09:39 IST2025-09-27T09:37:30+5:302025-09-27T09:39:55+5:30

पुढील शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे.

In Maharashtra, Now learn agriculture from the first grade; Agriculture subject to be included in the school curriculum step by step | आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश

आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश

मुंबई - शालेय अभ्यासक्रमात आता पहिलीपासून दहावीपर्यंत टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश केला जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ यांच्यामध्ये ‘व्यवसाय शिक्षणाची नवकल्पना’ याचा समावेश आहे. त्या अंतर्गत २०२५-२६ या वर्षी इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये कार्य शिक्षण या विषयांतर्गत कृषी शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे.

पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यासंदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंत्रालयात बैठक झाली. वय वर्षे ३ ते ८ मधील विद्यार्थ्यांना कार्य शिक्षण या विषयांतर्गत २१ व्या शतकातील महत्त्वपूर्ण कौशल्ये, तसेच कृषी, पर्यटन व्यावसायिकतेचा पाया याच सुरुवातीपासून घातला जाईल, अशा उपक्रमांची मांडणी करावी, अशी सूचना राज्यमंत्री भोयर यांनी बैठकीत दिल्या.

पुढील शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. नव्या पिढीची नाळ कृषी क्षेत्राशी जोडण्यासह कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विस्तार होण्यासाठी माती, पाणी, वनस्पती, पशु-पक्षी या विषयातील नवीन उपक्रम सुचवावेत.- डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण राज्यमंत्री

नवीन तंत्रज्ञानाची ओळख
सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना परसबाग, सेंद्रिय शेती, तृणधान्य उत्पादन, अन्न प्रक्रिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, बांबूंचा वापर, पाळीव प्राण्यांचे पोषण, कुक्कुटपालन, पाण्याचे लेखापरीक्षण, जैवविविधता नोंदणी, इंधनविरहीत स्वयंपाक आदी विषय उपलब्ध करून देण्यात यावे. शेतीसारख्या परंपरागत विषयात नवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधनांचा उपयोग कसा करावा, याचा अभ्यासक्रमात सहभाग असावा, असेही डॉ. भोयर यांनी सांगितले.
 

Web Title : पहली कक्षा से कृषि शिक्षा: पाठ्यक्रम में खेती विषय शामिल।

Web Summary : महाराष्ट्र के स्कूल 2025-26 तक पहली कक्षा से कृषि शुरू करेंगे। 10वीं कक्षा तक के पाठ्यक्रम में आधुनिक खेती तकनीक, जैविक तरीके और कृषि में कृत्रिम बुद्धिमत्ता शामिल है, जिसका उद्देश्य छात्रों को कृषि क्षेत्र से जोड़ना है।

Web Title : Agriculture education from first grade: Curriculum includes farming subjects.

Web Summary : Maharashtra schools will introduce agriculture from 1st grade by 2025-26. The curriculum, up to 10th grade, includes modern farming techniques, organic methods, and artificial intelligence in agriculture, aiming to connect students with the agricultural sector.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.