शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

भिवंडीत बोगस टेलिफोन एक्सचेंजवर छापे; दाऊद टोळीकडून वापर, 10 आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 5:01 AM

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर तसेच छोटा शकील व अनिस इब्राहिम यांनी खंडणी वसुलीकरिता केलेले आंतरराष्ट्रीय कॉल्स स्थानिक असल्याचे

ठाणे : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर तसेच छोटा शकील व अनिस इब्राहिम यांनी खंडणी वसुलीकरिता केलेले आंतरराष्ट्रीय कॉल्स स्थानिक असल्याचे भासवणा-या भिवंडीतील बोगस टेलिफोन एक्सचेंजवर गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी रात्री छापे टाकले. कारवाईत १0 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.एक्सचेंज चालवण्याकरिता लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकर आणि त्याच्या हस्तकांनी लोकांना धमकावण्यासाठी व्हीओआयपी (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) कॉल्सचा वापर केल्याची माहिती तपासात उघड झाली होती. छोटा शकील आणि अनिस इब्राहिम यांनी विदेशातून लोकांना धमकावले. मात्र त्यांनीही व्हीओआयपी कॉल्सचा वापर केल्याने फोन नेमका कुठून आला, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते.आॅगस्टमध्ये अंबरनाथ येथील एका व्यापाºयास खंडणीसाठी धमकावण्यात आले होते. पोलिसांनी या कॉलची पडताळणी केली असता, तो ओडिशा येथून आल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांचे पथक ओडिशा येथे गेले असता, तो कॉल तेथून केलाच नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चौकशी केली असता, आंतरराष्ट्रीय कॉल बोगस टेलिफोन एक्सचेंजद्वारे रूट करून त्या व्यापाºयाला जोडला गेला. अशा पद्धतीने कॉल जोडल्याने समोरच्या व्यक्तीला तो कॉल नेमका कुठून आला आहे, हे समजत नाही. बोगस टेलिफोन एक्सचेंजचे जाळे भिवंडीत असल्याची माहिती उघड झाल्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी रात्री भिवंडीतील साईनगर नागावमध्ये छापे टाकले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एकाच वेळी जवळपास ३0 ठिकाणी छापे टाकले. त्यासाठी गुन्हे शाखेने वेगवेगळी पथके तयार केली होती.घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात सिम बॉक्सेस, राऊटर्स, नोटपॅड, मोबाइल फोन आदी साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी जवळपास १0 आरोपींना ताब्यात घेतले आहे.रात्री उशिरापर्यंत छापे सुरूच असल्याने पोलिसांनी या प्रकरणी फारशी माहिती दिली नाही. मात्र हे प्रकरण गंभीर असून, त्याची व्याप्ती मोठी असल्याचा दावा अधिका-यांनी केला.

टॅग्स :Crimeगुन्हाjailतुरुंगArrestअटकPoliceपोलिस