राज्यात पहिली, सहावीत यंदापासून मराठी सक्तीची अंमलबजावणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:13 AM2020-05-12T06:13:29+5:302020-05-12T06:13:49+5:30

महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे. शिक्षण आयुक्त विश्वास सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी बैठक झाली.

Implementation of Marathi compulsory from the first and sixth year in the state | राज्यात पहिली, सहावीत यंदापासून मराठी सक्तीची अंमलबजावणी  

राज्यात पहिली, सहावीत यंदापासून मराठी सक्तीची अंमलबजावणी  

googlenewsNext

मुंबई : राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून पहिली व सहावी या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तीचे केले जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेतला.
महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे. शिक्षण आयुक्त विश्वास सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी बैठक झाली.
आगामी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी मराठी भाषेचा वर्गवार अभ्यासक्रम, इयत्ता पहिली व सहावीसाठी पाठ्यपुस्तके आणि प्राशिक्षण साहित्य, तयार करण्याबाबत देसाई यांनी सूचना केली. २०२०-२१ च्या प्रथम सत्रापासून सर्व माध्यमांच्या शाळांनी मराठी विषय सक्तीने शिकविण्याच्या कायद्याचे अनुपालन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अधिसूचना निर्गमित करावी, असेही त्यांनी सूचविले. नियमावली तयारी करण्यासाठी एका कार्यबल गटाची स्थापना केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Implementation of Marathi compulsory from the first and sixth year in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.