शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध थांबे लावताहेत ‘आयुष्याला ब्रेक’

By admin | Updated: November 16, 2014 23:34 IST

महामार्गावर उभे राहणे जीवघेणे : खासगी वाहनांच्या थांब्यांवर कुणाचेही नाही नियंत्रण ---हायवेवर मृत्यूचा सापळा

दत्ता यादव --सातारा  चौपदरी महामार्गावर उभारण्यात आलेल्या ब्रीजवर अधिकृत थांबे नसतानाही काही चालक केवळ आळस म्हणून सेवा रस्त्यावर एसटी नेत नाहीत. ब्रीजच्या कडेला एसटी उभी राहत असल्यामुळे जीव धोक्यात घालून मृत्यूच्या सावलीला उभे राहण्याची सवय प्रवाशांना लागली आहे. अशा नियम मोडणाऱ्यांवर जिल्हा वाहतूक शाखा आणि महामार्ग पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे रोज अनेक लोक जायबंदी होत आहेत. पारगाव खंडाळा येथे महामार्गाच्या कडेला एसटीची वाट पाहात उभ्या असलेल्या प्रवाशांवर काळाने घाला घातल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एसटी चालकांनी ब्रीजवर वाहने न थांबविता सर्व्हिस रस्त्यावर थांबविली असती तर लोकांचे प्राण वाचले असते, असा मुद्दा यानिमित्ताने पुढे आलाय. मात्र, अशा नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या यंत्रणाच ढिम्म झाल्याने अनेक प्रवाशांना जीवाला मुकावे लागत आहे. नवीन चौपदरी हायवे झाल्यानंतर ब्रीज उभारण्यात आले. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय झाली; परंतु अनेक वाहनचालक त्याचा गैरफायदाही घेत आहेत. वास्तविक अशा ब्रीजवर वाहनांना थांबण्यास सक्त मनाई असते; मात्र काही एसटी चालक सेवा रस्त्यावर जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो म्हणून महामार्गावरच एसटी उभी करतात. प्रवाशांना त्याची सवय झाल्याने अनेक प्रवासी रोज महामार्गावर उभे राहिलेले दिसतात. कऱ्हाड ते खंडाळादरम्यान सुमारे पाच मोठे ब्रीज आहेत. त्यामध्ये कऱ्हाड, उंब्रज, सातारा, खंडाळा, शिरवळ या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच अतीत, नागठाणे, शेंद्रे, बॉम्बे रेस्टॉरंट, भुर्इंज या ठिकाणी ब्रीज नसले तरी महामार्गावर प्रवासी वाहनांची वाट पाहात उभे असतातच. काही खागसी वाहनेही महामार्गावर वडाप करतात. वेळ आणि पैसा वाचतो, असे समजून काहीजण महामार्गावर मिळेल त्या वाहनाने प्रवास करतातात. जिल्हा वाहतूक शाखा, महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा अशा अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असतो; मात्र ही ‘खाकी’ नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई न करता चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देण्यात धन्यता मानते. अशा प्रकारची घटना घडल्यानंतरच या यंत्रणा कार्यान्वित होतात. आता या घटनेतून तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोध घ्यावा, एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.महामार्गावरील अनाधिकृत थांबा बंद करण्यात यावा, याबाबत वारंवार ठराव खंडाळा पंचायत समिती, पारगाव, खंडाळा ग्रामपंचायतीने एस. टी. प्रशासनाला लेखी व तोंडी स्वरूपात दिला आहे. तरीही याकडे दुर्लक्ष झाले. अपघाताच्या ठिकाणची एस. टी. सुरू नसती तर कंटेनरमुळे भयंकर स्थिती निर्माण झाली असती.महामार्गावर अधिकृतरीत्या दिलेल्या थांब्यांवर एसटी उभी करता येते. अन्यत्र उभी करता येत नाही. अनेक प्रवासी बसस्थानकात जाण्याचा कंटाळा करतात. त्यांच्यासाठी महामार्गावर एसटी न थांबल्यास अनेकवेळा तक्रारीही येत असतात. त्यामुळे प्रवाशांनी महामार्गावर हात केल्यास वाहन थांबवावे लागते; मात्र या अपघातावेळी एसटी त्या ठिकाणी थांबलेली नव्हती. दोन्ही वाहने पुण्याकडे निघाली होती.- धनाजी थोरात, विभाग नियंत्रकठरावाचे काय ?महामार्गावरील अनाधिकृत थांबा बंद करण्यात यावा, याबाबत वारंवार ठराव खंडाळा पंचायत समिती, पारगाव, खंडाळा ग्रामपंचायतीने एस. टी. प्रशासनाला लेखी व तोंडी स्वरूपात दिला आहे. तरीही याकडे दुर्लक्ष झाले. अपघाताच्या ठिकाणची एस. टी. सुरू नसती तर कंटेनरमुळे भयंकर स्थिती निर्माण झाली असती.