शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात बेकायदेशीर गर्भपात केंद्र ; डॉक्टरला अटक; हॉस्पिटल सील

By admin | Updated: February 20, 2017 19:42 IST

मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळानाका परिसरात असलेल्या एका रुग्णालयात बेकायदेशीरपणे गर्भपात केंद्र

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळानाका परिसरात असलेल्या एका रुग्णालयात बेकायदेशीरपणे गर्भपात केंद्र व गर्भलिंगनिदान केंद्रावर महापालिकेच्या वैद्यकिय विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली. दरम्यान, संशयित डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. महमार्गाला लागून असलेल्या शिंदे रुग्णालयात बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान चाचण्या केल्या जात असल्याची बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली होती. यानुसार वैद्यकिय आरोग्यधिकारी डॉ. विजय देकाटे यांनी संशयित डॉ. बळीराम निंबा शिंदे यांच्याविरुध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, डॉ. बी. एन. शिंदे यांना पोलिसांनी अटक केली असून जिल्हा व सत्र न्यायालयाने २५ फेबु्रवारीपर्यंत शिंदे यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी, देकाटे यांनी रुग्णालयाला भेट देऊन शिंदे यांची चौकशी केली असता त्यांनी चौकशीमध्ये सहकार्य न करता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांचा संशय बळावला अधिक तपासणी केली असता रुग्णालयाची परवानगी न घेता रुग्णालय सुरू करून त्यामध्ये आॅपरेशन थिएटरदेखील कार्यान्वित करण्यात आल्याचे आढळून आले. सदर हॉस्पिटल हे नर्सिंग होम अ‍ॅक्टनुसार नोंदणीकृत नसल्याचे आढळून आले.यावेळी हॉस्पिटलचे डॉ. शिंदे यांचेसह कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याशिवाय, पथकाने या महिलेवर उपचार करणारे डॉ. विजय थोरात, भूलतज्ज्ञ डॉ. विजय पिचा,डॉ. सचिन जाधव यांचीही चौकशी करुन जाबजबाब नोंदविले आहेत.

बीडनंतर नाशकात प्रकार उघडकीस---

शिंदे यांच्या वैद्यकीय पदव्यांबाबतही महापालिकेच्या पथकाला शंका आहे़ परळी बीड येथील डॉ़ मुंढे प्रकरणानंतर अवैध गर्भजलचिकित्सा व गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांची विशेष शोध मोहीम घेऊन कारवाई केली जात असतानाच नाशिकमध्ये सदर प्रकरण समोर आले.पथकाला गर्भपात केलेली सदर महिला रुग्णही त्याठिकाणी उपचार घेताना आढळून आली. या प्रकरणी महिला रुग्णाच्या नातेवाईकांचेही जबाब नोंदविण्यात आले असून रुग्ण महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे डॉ. डेकाटे यांनी सांगितले.

महिलेचा केला गर्भपात....

एका महिलेच्या गर्भाच्या लिंगाचे निदान करुन त्या महिलेला गर्भपात करुन घेण्याचा सल्ला शिंदे यांनी देत गर्भपात करुन पुरावे नष्ट केल्याचा आरोप संशयित शिंदे यांच्यावर आहे. देकाटे यांच्या फिर्यादीवरुन मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरिक्षक प्रणिता पवार करीत आहेत.