"पुढचा डोस कधी द्यायचा हे मी तुम्हाला सांगेन... एक चमत्कार तुम्ही करा, एक मी करतो"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 06:03 PM2024-06-20T18:03:23+5:302024-06-20T18:03:49+5:30

Sharad pawar in Baramati : गेल्या तीन दिवसांपासून ते बारामती पिंजत असून गावोगावी जात राज्य हातात घेण्याचे वक्तव्य करत आहेत. शरद पवार, अजित पवार यांच्या काटेवाडीतही त्यांनी सभा घेतली होती.

"I'll tell you when to give the next dose... One miracle you do, one I do", Sharad pawar in baramati against Ajit pawar ncp | "पुढचा डोस कधी द्यायचा हे मी तुम्हाला सांगेन... एक चमत्कार तुम्ही करा, एक मी करतो"

"पुढचा डोस कधी द्यायचा हे मी तुम्हाला सांगेन... एक चमत्कार तुम्ही करा, एक मी करतो"

शरद पवारांनी लोकसभा विजयाच्या निमित्ताने विधानसभेच्या पेरणीला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते बारामती पिंजत असून गावोगावी जात राज्य हातात घेण्याचे वक्तव्य करत आहेत. शरद पवार, अजित पवार यांच्या काटेवाडीतही त्यांनी सभा घेतली होती. आज लोणी भापकरमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी आपले पुढारीच गायब झाले होते, तरीही लोकांनी दडपशाहीला झुगारून आपल्याला मतदान केल्याचे शरद पवार म्हणाले. 

मोदींपेक्षा जास्त मताने तुम्ही तुमचा खासदार जिंकविला. मोदींची गॅरंटी इथे चालली नाही. या मोदींनी काही माझा बांध कोरलेला नाही. परंतू त्यांचे धोरण आपल्या हिताचे नव्हते. शेतकऱ्याला कसे अडचणीत आणता येईल याचाच विचार हे मोदी सरकार करत असते. त्यांच्या म्हणण्यानुसार ते खाणाऱ्यांचा विचार करतात, अरे परंतू जर पिकवणाऱ्यानेच पिकवले नाही तर खाणारा खाणार तरी काय असा सवाल पवारांनी भाजपाला केला. 

या निवडणुकीत एकही पुढारी दिसत नव्हता. मी विचारायचो कुठे गेला,  जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा कळले. आता हाच चमत्कार विधानसभेलाही करायचा आहे. एक तुम्ही करा, एक मी करतो, असे संकेत पवारांनी दिले. आपण जनाई शिरसाई, पुरंदरच्या उपसा योजना केल्या आहेत. पण सत्तेत असलेल्यांनी त्याकडे पाहिलेही नाहीय. हे बदलायचे आहे. राज्यच हातात घ्यायचे आहे. दुधाचे अनुदान मिळविण्यासाठी हालचाली करायची तयारी आहे का, असा सवाल करत माझी तयारी असल्याचे पवार म्हणाले. 

काहीही करा पण जमीन विकू नका, आपण मार्ग काढुया. आधी पाणी आणुया, मग कांडे रोवुया, पुढचा डोस कधी द्यायचा हे मी तुम्हाला सांगेन असे पवार यांनी गावकऱ्यांना म्हटले. 

Web Title: "I'll tell you when to give the next dose... One miracle you do, one I do", Sharad pawar in baramati against Ajit pawar ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.