- विकास शिंदे
मनोमिलन दोन मनांचे होत असते त्या मुळे दुसऱ्या मनाला आधी विचारलं पाहिजे त्यांचे व माझे मनोमिलन व्हायला एकतर्फी प्रेम नको फलटणच्या जेष्ठांनी तसे प्रयत्न केले आहेत त्यांनी ते करावेत मनोमिलनाला आमचा विरोध नाही मनोमिलन हा प्रश्न माझ्या एकट्याचा नसून मनोमिलन एकतर्फी प्रेमातून होत नाही फलटणच्या विकासाचं राजकारण करायचे असेल तर मनोमिलन होईल सत्तेचं राजकारण थांबले तर विचार करू असे सूचक वक्तव्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे ना निंबाळकर यांनी लक्ष्मी विलास या त्यांच्या फलटण येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत केले.
गेली पंधरा दिवसांपासून फलटणच्या राजकीय क्षेत्रात मनोमिलनाचे वारे वाहत असून याबाबत अनेक उलट सुलट बातम्या व चर्चा बाहेर येत आहेत सर्वात प्रथम लोकमत मधून ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली त्या वेळी राजकीय जाणकारांच्या ही भुवया उंचावल्या होत्या बातमीची दखल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही घेतली व या संदर्भात फलटण च्या मनोमिलनाची चाचपणी त्यांच्या खास जवळच्या माणसांकडून केल्याचे वृत्त ही लोकमत ने प्रसिद्ध केले होते.
मनोमिलन होणार की नाही याबाबत फलटणच्या व सर्व सामान्य जनतेच्या मनात उत्सुकता आहे परंतू माजी खासदार रणजितसिंह यांच्या गटाचे आमदार सचिन पाटील निवडून आल्यावर अनेक मातब्बर नेत्यांनी राजे गटाला राम राम ठोकत रणजितसिंह यांच्या पारड्यात वजन टाकले आता मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्यावर इकडून तिकडे व तिकडून इकडे येणाऱ्या नेत्यांची चांगलीच दमछाक झाली आहे.
लक्ष्मी विलास येथे रामराजे यांनी केलेले वक्तव्य मनोमिलनाच्या चर्चांना पुष्टी देणारेच आहे त्यांनी आशा चर्चांचे स्पष्ट खंडन केले नाही तर उलट मनोमिलन दोन मानांचे होते फलटणच्या विकासाचे राजकारण होणार असेल तर मनोमिलन होईल असे सांगून मनोमिलन चर्चेचा चेंडू रणजितसिंह यांच्या बाजूला ढकलला आहे यावर माजी खासदार रणजितसिंह काय उत्तर देतात याकडे कार्यकर्त्याचे लक्ष लागून राहिले आहे.
यावेळी बोलताना रामराजे यांनी मनोमिलना बाबत वरिष्ठांनी सांगितले तर होईल नाहीतर होणार नाही त्यामुळे दोन्ही गटांचे पक्षश्रेष्ठींची भूमिका महत्त्वाची आहे असेही रामराजे यांनी स्पष्ट केले
Web Summary : Ramraje Naik Nimbalkar suggests a merger is possible if it benefits Phaltan's development. He emphasizes mutual agreement and senior leaders' roles. Discussions follow news of political shifts post-election, with leaders potentially switching sides. Party leaders' decisions are crucial for any alliance.
Web Summary : रामराजे नाइक निंबालकर ने फलटण के विकास के लिए विलय की संभावना जताई। उन्होंने आपसी सहमति और वरिष्ठ नेताओं की भूमिका पर जोर दिया। चुनाव के बाद राजनीतिक बदलाव की खबरों के बाद चर्चा, नेता संभावित रूप से पक्ष बदल रहे हैं। किसी भी गठबंधन के लिए पार्टी नेताओं के फैसले महत्वपूर्ण हैं।