मला बदनाम करायचे असेल तर करा, पण...; धनंजय मुंडेंचे विरोधकांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 16:12 IST2025-01-19T16:12:31+5:302025-01-19T16:12:52+5:30

आताची परिस्थिती बघता आपण ती जबाबदारी घेता नये. यामुळे अजित पवारांकडे देण्यात आली आहे. माझी पक्षाच्या प्रति भावना आहे. ज्या ज्या लोकांनी आरोप केले आहेत, त्यांनी एकतर आरोप खरा करून दाखवावा, असे आव्हान मुंडे यांनी दिले. 

If you want to defame me, do it, but...; Dhananjay Munde challenges opponents | मला बदनाम करायचे असेल तर करा, पण...; धनंजय मुंडेंचे विरोधकांना आव्हान

मला बदनाम करायचे असेल तर करा, पण...; धनंजय मुंडेंचे विरोधकांना आव्हान

बीड जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता अजित पवार यांच्याकडेच पालकमंत्री पदाची जबाबदारी द्यावी, अशी मी स्वत: च अजित पवार आणि मुख्यमंत्री यांना विनंती केली होती. पुणे जिल्ह्याचा जसा विकास झाला तसा अजित पवारांमुळे बीडचा विकास होईल, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

आताची परिस्थिती बघता आपण ती जबाबदारी घेता नये. यामुळे अजित पवारांकडे देण्यात आली आहे. माझी पक्षाच्या प्रति भावना आहे. ज्या ज्या लोकांनी आरोप केले आहेत, त्यांनी एकतर आरोप खरा करून दाखवावा, असे आव्हान मुंडे यांनी दिले. 

मला विनाकारण त्यावर आता काय मला बोलायच नाही. ज्यावेळी बोलायचे असेल तेव्हा मी बोलायला कमी पडणार नाही. बीड जिल्ह्यात सामाजिक सलोखा निर्माण होणे, माझ्यासारख्या नागरिकाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे. माझी विनंती आहे मला बदनाम करायचे असेल तर करा, पण कृपा करून बीड जिल्ह्याला वैजनाथ नगरीला बदनाम करु नका, असे मुंडे म्हणाले. 

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट  वाटत आहे, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. 

Web Title: If you want to defame me, do it, but...; Dhananjay Munde challenges opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.