शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्र न दिल्यास तुरुंगात पाठवू

By admin | Updated: July 22, 2016 03:55 IST

जातवैधता प्रमाणपत्र न दिल्याने उच्च न्यायालयाने नाशिकच्या आयुक्तांसह सदस्यांनाही कारागृहात रवानगी करण्याची तंबी दिली

मुंबई : नाशिकच्या अनुसूचित जमाती जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दोन आठवड्यांत जातवैधता प्रमाणपत्र न दिल्याने उच्च न्यायालयाने नाशिकच्या आयुक्तांसह सदस्यांनाही कारागृहात रवानगी करण्याची तंबी दिली आहे. एका अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाने नाशिकच्या जातपडताळणी समितीच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका करत, समितीचे सदस्यच बदलण्याचा इशारा दिला.‘नाशिक जातपडताळणी समितीचा कारभार ढिसाळ असून, त्यांना असा विचित्र आदेश देताना लाजलज्जा वाटत नाही का?’ असेही उच्च न्यायालयाने विचारले. समितीचे आयुक्त व सदस्य सुधारले नाहीत, तर त्यांच्याऐवजी आम्ही कायदेशीररीत्या दुसरे सदस्य व आयुक्त नेमू. सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला.कायद्याचे भान न ठेवता, या समित्या आदेश देतात आणि मग सगळी प्रकरणे उच्च न्यायालयात येतात. उच्च न्यायालयाने आता जात पडताळणी समितीचे काम करायचे का, असा सवालही उच्च न्यायालयाने केला. अकीब जावेद कादरी या मुलाच्या सख्ख्या बहिणीला, काकांना आणि चुलत भावाला छप्पर बंद जमातीचे असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आणि जातपडताळणी समितीने ते वैध ठरवले. याच नातेवाइकांच्या जातवैधता प्रमाणपत्राच्या आधारावर, अकीब याने वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी २०१३मध्ये नाशिकच्या विभागीय जातपडताळणी प्रमाणपत्र तपासणी समितीकडे अर्ज केला. नातेवाइकांचे जातवैधता प्रमाणपत्र अर्जाला जोडूनही समितीने त्याचा दावा फेटाळला. त्यामुळे अकीब याने अ‍ॅड. आर. के. मेंदाडकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या पुढे होती. दुसऱ्या केसमध्ये नाशिकच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने भूषण देवर याचाही दावा अशाच प्रकारे फेटाळला. जूनमध्ये उच्च न्यायालयाने पडताळणी समितीला दोन आठवड्यांत वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश आयुक्तांना दिले. मात्र, दोन आठवडे उलटूनही समितीने जातवैधता प्रमाणपत्र न दिल्याने देवर याने अवमान याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने आयुक्तांसह सदस्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुरुवारच्या सुनावणीत सदस्य खंडपीठापुढे उपस्थित राहिले. आयुक्तांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण पुढे करत, न्यायालयापुढे उपस्थित राहणे टाळले. (प्रतिनिधी)>२५ जुलैपर्यंत प्रमाणपत्र द्या!खंडपीठाने २५ जुलैपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र द्या किंवा २६ जुलैला कारागृहात जाण्याची तयारी ठेवा, अशी तंबी उपस्थित सदस्यांना दिली. ‘जर सोमवारपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, तर २६ जुलैला कपडे व अन्य तयारी करूनच या. तुमची इथूनच कारागृहात रवानगी करण्यात येईल,’ असे खंडपीठाने म्हटले.