शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘एवढीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्याविरोधात लढा’, श्रीकांत शिंदेंचं गणेश नाईकांना आव्हान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 16:41 IST

Shrikant Shinde Challenges Ganesh Naik: भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात गेल्या काही काळापासून जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिलं जात आहे.

अंबरनाथ - भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात गेल्या काही काळापासून जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिलं जात आहे. याचदरम्यान, गणेश नाईक यांनी फक्त पक्षाने आदेश दिला तर श्रीकांत शिंदे यांच्या नावासमोर कायमचं माजी खासदार लिहावं लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईकांना प्रत्युत्तर दिलं आहे. गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आमच्या समोर निवडणूक लढवावी, असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे.

गणेश नाईक यांनी  केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे  म्हणाले की, गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे ते काहीही टीका करत आहेत. तर गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. नागरिकांनी त्यांना अनेकदा माजी केलं आहे याचे त्यांनी भान ठेवावे. आणि जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवे तिथून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान देखील श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना यावेळी दिले.

दरम्यान , काल नगरविकास खात्यातील कारभारावरूनदेखील गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.  "नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते. ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत. नगरविकास खात्यातील लोकांनी हे कर्म दरिद्री काम केले आहे. रुग्णालया करिता. बागे करिता. एखाद्या शाळे करिता, भूखंड मागितले, पण ते दिले गेले नाही. काही दलालांनी ते बिल्डरांच्या घशात घातले, असा आरोप गणेश नााईक यांनी केला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shrikant Shinde dares Ganesh Naik to fight Lok Sabha election.

Web Summary : Shrikant Shinde challenged Ganesh Naik to contest the upcoming Lok Sabha election. He accused Naik of memory loss and misusing his position. This came after Naik criticized Eknath Shinde regarding land allocations.
टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेGanesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा