शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती नाही तर मग आत्महत्या कशा थांबणार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 22, 2015 11:50 IST

कर्जमाफीमुळे शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नसतील तर मग कशा थांबणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २२ - शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी फेटाळून लावण्याचा कणखरपणा मुख्यमंत्र्यांनी दाखवला असला तरी कणा मोडून बसलेल्या लाखो शेतक-यांचे जीवन ते कसे उभे करणार, शेतक-यांच्या आत्महत्या कशा थांबणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांच्या कर्जमाफी देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस सरकारला फटकारले आहे. शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी ही आमची मागणी आहे, चोर- चिलटे, गुन्हेगारांना माफी दिली जाते, शेतकरी हा गुन्हेगार नाही तो राजा आहे, पण निसर्गाची अवकृपा व सरकारची चुकलेली धोरणे यामुळे तो भिकारी बनला आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राजकारणी, मंत्री व नोकरशहा यांचे उत्पन्न वाढते, सरकार व बँकांना डुबवणा-या उद्योगपतींना पुन्हा कर्ज मिळते, पण शेतकरी या सर्वात बसत नसल्याने तो उपाशी आहे असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातला शेतकरी कधीच लुळापांगळा झाला असून तो कसाबसा कुबड्या घेऊन उभा राहण्याचा प्रयत्न  सुरु आहेत हे मुख्यमंत्र्यांचे विधान मान्य केले तर त्याला स्वत:च्या पायावर उभे कसे करणार? कर्जमुक्तीच्या प्रश्‍नाने आत्महत्या थांबणार नसतील तर त्या कोणत्या उपायाने थांबतील? अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी फडणवीस सरकारवर केली आहे.