शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान मोदी विष्णूचे अवतार, तर त्यांनी ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवं...!" नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:58 IST

"नरेंद्र मोदी हे विषणूचे आवतार... आहेत का? तिकडे ट्रम्प भारताला धु-धु धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. या देवाने ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवे," असे राऊत यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी मंगळवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी बेटकर यांच्या हाती शिवबंधन बांधले. यावेळी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना श्रीकृष्ण, असे संबोधले होते. यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता, संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांच्या टीलेला प्रत्त्युत्तर दिले. ""नरेंद्र मोदी हे विषणूचे आवतार... आहेत का? तिकडे ट्रम्प भारताला धु-धु धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. या देवाने ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवे," असे राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते.

बावनकुळे आणि उदय सामनंत यांच्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले, "मला पोटशूळ उठत नाही. मी अजिबात तुलना केलेली नाही. त्यांनी पहाव, ते मुर्ख लोक आहेत. नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो का? नरेंद्र मोदी विष्णूचे 13 वे 14 वे अवतार, नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल, आकाशातून देवानेच पाठवले आहे. त्यांची छत्रपतींशीच तुलना होते. हे या बावनकुळेंना आणि उदय सामंतांना चालू शकते का? कुणीही कुणाची तुलना केलेली नाही. आम्ही माणसं आहोत. देव नाही. म्हणून आम्ही संघर्ष करत आहोत. आम्ही माणसं आहोत, म्हणून आमच्या पाटीत खंजीर खुपसले गेले. उद्धव ठाकरे यांचे 'उद्धव' हे नाव, भगवान श्रीकृष्णांची अनेक नाव होती, त्यात उद्धव एक नाव होते, असे मी सांगितले.

राऊत पुढे म्हणाले, "सहदेव हे महाभारतातील एक पात्र होते. जे पांडव होते, त्यात एक सहदेव  होते आणि संजय आहेच कायम महाभारतात. यांच्या कानाचे ऑपरेशन करायला हवे किंवा यांच्या मेंदूत जो कचरा साचला आहे, तो साफ करायला हवा. आम्ही कधी बाळासाहेबांचीही देवाशी तुलना केली नाही. कारण, बाळासाहेबांना ते आवडत नव्हतं. यांना हिंदू हृदयसम्राट समजले नाही, यांना वीर सावरकर समजजले नाहीत, यांना उद्धव ठाकरे समजले नाही, मग यांना काय समजते? यांना केवळ चमचेगिरी आणि बूट चाटे गिरी कळते."

"नरेंद्र मोदी हे विषणूचे आवतार... आहेत का? तिकडे ट्रम्प भारताला धु-धु धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. अख्ख जग ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात उठले आहे आणि केवळ एकच देश भारत देश तोंडात गोळ्या घालून बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत ना, मग या देवाने ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवे. काही बोलतात हे लोक, चंद्रशेखर बावनकुळे आणि रत्नागिरीचे उदय सामंत. सत्तेवर बसले आहेत. भोंगे सुटले आहेत," असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना