Karuna Sharma: 'मी सीडी बाहेर काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल'! करुणा शर्मांनी टाकला बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 17:44 IST2022-06-01T17:44:31+5:302022-06-01T17:44:38+5:30

Karuna Sharma News: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

If I take out the CD, the whole of Maharashtra will shake! - Karuna Sharma | Karuna Sharma: 'मी सीडी बाहेर काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल'! करुणा शर्मांनी टाकला बॉम्ब

Karuna Sharma: 'मी सीडी बाहेर काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल'! करुणा शर्मांनी टाकला बॉम्ब

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंचे काही महिलांशी अनैतिक संबंध आहेत. तसेच याबाबतची सीडी आपण बाहेर काढली तर संपूर्ण महाराष्ट्र हादरेल, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.

करुणा शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. २५ वर्षांचे २५ पुरावे माझ्याकडे आहे. त्यांनी मला तुरुंगात टाकले, तरी पती म्हणून त्यांचा मान ठेवत असल्याने मी त्यांच्याविरोधात एक शब्द बोललेला नाही. माझी बहीण आणि धनंजय मुंडेंमधील नात्यामुळे माझ्या बहिणीसोबत माझे संबंध चांगले नव्हते. मात्र मी काही बोलले नाही. धनंजय मुंडेकडून होत असलेल्या छळामुळे माझ्या आईचा मृत्यू झाला. माझ्या भावाचं ब्रेन हॅमरेज झालं होतं. धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा गैरफायदा घेत आहे. महाराष्ट्रात शक्ती कायदा असेल तर शरद पवारांनी धनंजय मुंडेंना लाथ मारून मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे. एकाच घरातील चार चार महिलांचा छळ धनंजय धनंजय मुंडेंकडून केला जात आहे.

मी धनंजय मुंडेंवर आरोप करत नाही आहे तर प्रत्येक गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत. धनंजय मुंडेंचे एक दोन नाही तर अनेक महिलांशी अनैतिक संबंध आहे. माझ्याकडे माझी बहिणी आणि धनंजय मुंडेंच्या संबंधांचेही फोटो व्हिडीओ आहेत मात्र ते मी समोर आणणार नाही, कारण त्यात धनंजय मुंडेंप्रमाणेच माझी बहिणही आक्षेपार्ह स्थितीत आहे. मला असा पती नकोय. मी त्याचं कधीच पिंडदान केलं आहे.

धनंजय मुंडे वेगवेगळ्या मोबाईल नंबर्सवरून का बोलतात. एका वेश्येकडेही एवढे नंबर्स नसलीत, मग हे मुंडे नेमकं बोलतात कुणाशी. मी खंडणी मागते असा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता. मात्र मीच धनंजय मुंडे यांना एक कोटी रुपये दिले आहेत. त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनाही पैसे दिले आहेत. मात्र आज माझ्यावर सोनं विकून घर चालवण्याची वेळ आली आहे. माझ्याकडेही काही सीडी आहेत. त्या लावला तर अख्खा महाराष्ट्र हादरेल असा दावाही करुणा शर्मा यांनी यावेळी केला.  

Web Title: If I take out the CD, the whole of Maharashtra will shake! - Karuna Sharma