शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

खैरेंवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन

By admin | Updated: November 2, 2015 03:13 IST

खा.चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात महसूल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली आहे. अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला नसल्यामुळे सोमवारी

औरंगाबाद : खा.चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात महसूल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली आहे. अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला नसल्यामुळे सोमवारी महसूल प्रशासनाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय अधिकारी व कर्मचारी संघटनांनी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास मराठवाड्यात आंदोलन करून संपावर जाण्याचा इशारा संघटनांनी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. शनिवारी अहमदनगर तसेच औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयांत द्वारसभा घेऊन कर्मचारी संघटनांनी खा.खैरे यांनी तहसीलदार रमेश मुंडलोड यांना शिवीगाळ करण्याच्या घटनेचा निषेध केला. औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्तालयापर्यंत मोर्चाही काढून डॉ.उमाकांत दांगट यांना निवेदन दिले. ‘लिफ्ट’ मिळविण्याचा प्रयत्न वाळूज येथील धार्मिक स्थळे हटविण्याच्या कारवाईत त्यांनी पोलीस व महसूल प्रशासनावर आगपाखड केली. शिवाय तहसीलदारांना शिवीगाळही केली. हिंदुत्वाच्या मुद्यावर महाभारत घडले असतानाही शिवसेनेतील एकही आमदार, संघटनेचा प्रतिनिधी खैरे यांच्या समर्थनार्थ पुढे आलेला नाही. पालकमंत्र्यांच्या गटातील कुणीही खैरे यांना या प्रकरणात ‘लिफ्ट’ दिलेली नाही. खैरे सध्या अडगळीला आहेत. वाळूज, बजाजनगरच्या प्रकरणात जर त्यांना पुन्हा ‘लिफ्ट’ मिळाली तर ते पुन्हा आपल्या मानगुटीवर बसतील, अशी भीती उर्वरितांना असल्याची चर्चा आहे.भाजपाची कोंडी...भाजपाने बजाजनगर प्रकरणात खैरेंच्या निषेधाची भूमिका घेतली, तर दुसरीकडे पाडापाडी झालेल्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पाहणी केली. मुळात भाजपाची या प्रकरणात कोंडी झाली आहे. खैरे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधात भाषण केल्यामुळे भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर वगळता पक्षातून या प्रकरणावर कुणीही बोलले नाही. पश्चिम मतदारसंघातून भाजपाला नेतृत्व नाही. त्यामुळे पक्षाने याप्रकरणी खैरेंचा निषेध करून प्रकरण थांबविले. शिवाय खैरे मोठे होतील, या भीतीनेदेखील कुणी पुढे आले नसल्याची चर्चा आहे. पोलिसांची गोचीपोलिसांची सध्या गोची झाली आहे. चार दिवसांपूर्वी प्रकरण घडले आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलीस ठाण्यात महसूल विभागातील सर्व संघटनांनी फिर्याद दिली आहे. परंतु पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवून घेतली आहे. खैरे यांनी न्यायालयाची बेअदबी केली आहे की नाही, याचा अहवाल न्यायालयाने मागविल्याचे समजते. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली मनपा निवडणूक मतदानामुळे रविवारी सायंकाळपर्यंत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी विलंब के ल्याचे बोलले जात असले तरी पोलिसांची गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत गोची झाल्याचे दिसते आहे.