शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श फेम अधिकारी ‘साइड’ला

By admin | Updated: May 31, 2014 05:24 IST

आदर्श प्रकरणात दोन वर्षांच्या निलंबनानंतर प्रशासकीय सेवेत सामावून घेण्यात आलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी जयराज फाटक आणि प्रदीप व्यास यांना कमी महत्वाच्या जागी नियुक्ती देण्यात आली आहे.

मुंबई : आदर्श प्रकरणात दोन वर्षांच्या निलंबनानंतर प्रशासकीय सेवेत सामावून घेण्यात आलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी जयराज फाटक आणि प्रदीप व्यास यांना कमी महत्वाच्या जागी नियुक्ती देण्यात आली आहे. आठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश शासनाने शुक्रवारी दिले. यात जयराज फाटक यांची महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली, तर प्रदीप व्यास यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक महामंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. आदर्श प्रकरणात ठपका ठेवण्यात आल्यामुळे २२ मार्च २०१२ ला दोन्ही अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती़ अलीकडेच राज्य शासनाने दोन्ही अधिकार्‍यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले. नियमानुसार या अधिकार्‍यांना दोन वर्षांहून अधिक काळ निलंबित करता येत नसल्याने निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण या वेळी देण्यात आले. या दोन्ही अधिकार्‍यांविरुद्ध सीबीआय चौकशी तसेच विभागीय चौकशी सुरू आहे. या अधिकार्‍यांना पदभार देताना चौकशी प्रभावित होणार नाही, अशीच जबाबदारी सोपवण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले होते. त्यानुसार, तुलनेने कमी महत्त्वाच्या आणि दुय्यम मानल्या जाणार्‍या पदांवर या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. फाटक आणि व्यास यांच्यासोबतच अन्य सहा अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये ए.बी. कुलकर्णी- व्यवस्थापकीय संचालक, राज्य वित्तीय महामंडळ, मनिषा शर्मा- सचिव व आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली, एस़बी. पाटील- व्यवस्थापकीय संचालक, माविम, संजय खंदारे-उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, एस.पी. कडू-पाटील- सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, सोनाली पोंक्षे-वायंगणकर- अतिरिक्त विभागीय आयुक्त नाशिक विभाग समावेश आहे़ (प्रतिनिधी)