पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 22:20 IST2025-08-12T22:19:50+5:302025-08-12T22:20:21+5:30
या आठवड्यात पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
मागील आठवड्यातच आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आता पुन्हा एकदा राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये डॉ. अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर संजय कोलते यांची मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
काही दिवसापूर्वीच अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली केली आहे. त्यांची जागा रिक्तझाल्यानंतर असंघटीत कामगार विकास आयुक्तपदी सुशील खोडवेकर यांची नियुक्ती केली आहे.
या अधिकाऱ्यांची झाली बदली
१. लघिमा तिवारी (IAS:RR:2023) सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची सहायक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. नमन गोयल (IAS:RR:2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापली उपविभाग, गडचिरोली यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
३. डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त (IAS:RR:2023) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. सावन कुमार (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५.सुशील खोडवेकर (IAS:RR:2011) सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ, मुंबई यांना विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६. संजय कोलते (IAS:SCS:2010) जिल्हाधिकारी, भंडारा यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
७.डॉ. अशोक करंजकर (IAS:SCS:2009) यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.