शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

माझी तयारी होती, टाळी उद्धवने टाळली!

By admin | Updated: October 10, 2014 05:56 IST

भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडल्यानंतर एकत्र येण्याकरिता आपण हात पुढे केला होता. मात्र उद्धवनेच टाळाटाळ केली

मुंबई : भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडल्यानंतर एकत्र येण्याकरिता आपण हात पुढे केला होता. मात्र उद्धवनेच टाळाटाळ केली. त्यामुळे नाइलाजाने मनसेने आपले उमेदवार उभे केले, अशी कबुली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. मात्र त्याच वेळी निवडणुकीनंतर शिवसेना-मनसे एकत्र येण्याचे संकेतही त्यांनी दिले. राज ठाकरे यांनी शिवसेना-मनसे हे पक्ष एकत्र येण्याबाबत पडद्याआड झालेल्या ‘त्या’ हालचालींची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, शिवसेनेबरोबरची युती भाजपाने तोडली त्या दिवशीच बाजीराव दांगट हे आपल्याकडे आले व त्यांनी शिवसेना-मनसे यांनी एकत्र येण्याचा आग्रह धरला. त्यानंतर उद्धव यांचा फोन नंबर आपल्याकडे नसल्याने दांगट यांनी ‘मातोश्री’वर जाऊन फोन लावून आमचे बोलणे करून दिले. त्या वेळी भाजपाने युती तोडल्याबद्दल उद्धव यांनी नाराजी प्रकट केली. त्या वेळी आपणच आता काय करायचे, असे उद्धव यांना विचारले व युतीकरिता प्रस्ताव दिला, असे राज यांनी सांगितले. त्या वेळी आमच्यासमोर तीन पर्याय होते. एक निवडणूकपूर्व जागावाटपात समझोता करायचा, निवडणूक प्रचारात परस्परांवर टीका टाळायची आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचे. जागावाटपातील समझोत्याकरिता मनसेतर्फे बाळा नांदगावकर तर शिवसेनेकडून अनिल देसाई यांच्यात चर्चा व्हावी याकरिता २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रयत्न केले गेले. मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस मनसेच्या उमेदवारांना बी फॉर्म दिले.निवडणुकीनंतर तुम्ही दोघे एकत्र येणार का व तुम्ही दोघे एकत्र येण्यात कुणाचा अहंकार आडवा येत आहे, असा सवाल राज यांना केला असता महाराष्ट्राचे हित हे कुणाच्याही अहंकारापेक्षा मोठे आहे. मात्र सध्या आपण केवळ पक्षाच्या विजयाचा विचार करीत आहोत. निवडणुकीनंतर याबाबतचा विचार केला जाऊ शकतो, असे स्पष्ट संकेत राज यांनी दिले. (प्रतिनिधी)