"योनीत बोट घातले, लघवी पाजली अन्...", मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितल्या खरातच्या अत्याचाराच्या कहाण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 18:13 IST2026-03-24T18:13:09+5:302026-03-24T18:13:55+5:30

अशोक खरात प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली. खरात विरोधात एकूण पाच गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. 

"I inserted my finger in her vagina, urinated on her and...", Chief Minister Fadnavis told stories of Kharat's torture | "योनीत बोट घातले, लघवी पाजली अन्...", मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितल्या खरातच्या अत्याचाराच्या कहाण्या

"योनीत बोट घातले, लघवी पाजली अन्...", मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितल्या खरातच्या अत्याचाराच्या कहाण्या

"एसआयटी तपासात शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात जप्त असलेल्या व्हिडीओच्या आधारे त्यातील पीडित महिला निष्पन्न करून, त्यांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. आरोपी अशोक खरात याचे भोंदूगिरी व जादूटोणा करून लैंगिक अत्याचार बळी पडलेल्या चार पीडित महिलांना निष्पन्न केले आहे. त्या चार पीडित महिलांचे जबाब नोंदवून घेऊन व एका साक्षीदाराने त्याच्या पत्नीबद्दल घडलेल्या प्रकरणातील गुन्हा, असे पाच स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहे", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "सरकारवाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ओकस प्रॉपर्टी येथे आरोपी अशोक खरातने तक्रारदाराच्या पत्नीस गरोदरपणात करावयाच्या धार्मिक विधीचे कारण सांगून तिच्या पोटावर, छातीवर हात फिरवून, तिच्या योनीत बोट घालून तिच्यावर बलात्कार केला."

अशोक खरातने वाघ दाखवून भीती घातली

"तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या खात्यावर पैसे घेतले. तसेच मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात सात नकली वाघ दाखवून भीती घातली, तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले", असे खरातचे प्रताप फडणवीसांनी विधानसभेत सांगितले.  

दुसऱ्या एका प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "७ ऑक्टोबर २०२४ ते १२ ऑक्टोबर २०२४ च्या दरम्यान सकाळी ११ वाजता ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर येथे तक्रारदार महिला आणि तिचा पती हे अशोक खरातला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी अशोक खरात याने महिलेच्या पतीला बाहेर पाठवले."

"मी तुझी शुद्धी केली आहे"

"अशोक खरात याने नंतर पीडित महिलेच्या हातात एक काळा दगड ठेवला आणि तिच्या कानात मंत्र पुटपुटला. तिच्या डोक्यावर, पाठीवर, छातीवर हात फिरवला. तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. 'तू घाबरू नकोस, तू माझ्या औरामध्ये आहेस, माझ्यात दैवी शक्ती आहे. मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे. मी तुझी शुद्धी केली आहे. तू झालेला प्रकार कोणाला सांगितला, तर तुझ्यावर देवाचा कोप होईल', असा दम महिलेला दिला", अशी माहिती फडणवीसांनी विधानसभेत सांगितले. 

'माझ्याशी संबंध ठेवल्यामुळे तू शुद्ध झालीस'

फडणवीस म्हणाले, "चौथ्या प्रकरणातील गुन्ह्यात एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत तक्रार महिलेला मुलगा व्हावा आणि तिची कौटुंबीक अडचण सुटावी, यासाठी तिला आरोपी अशोक खरात याने वेळोवेळी ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर येथे बोलावून तिला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास दिले. पेढा खायला दिला. तिला गुंगी आल्यानंतर त्याचा फायदा घेऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले."  

"अशोक खरात त्या महिलेला म्हणाला की, मी देवाचा अवतार आहे. माझ्याशी संबंध ठेवल्यामुळे तू शुद्ध झाली आहेस. तुझ्या सर्व अडचणी दूर होणार आहे. आणि हे जर तू कोणाला सांगितले तर देव तुझ्यावर कोपेल. तुझे चांगले होणार नाही, असा दम खरातने त्या महिलेला दिला", असेही फडणवीसांनी विधानसभेत सांगितले.

Web Title : फडणवीस ने खोले खरात के अत्याचार: यौन हमला, पीड़ितों को पिलाया मूत्र।

Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने विधानसभा में अशोक खरात के जघन्य कृत्यों का खुलासा किया, जिसमें धार्मिक अनुष्ठानों के बहाने यौन हमला और पीड़ितों को मूत्र पिलाना शामिल है। पीड़ितों के बयानों के आधार पर खरात के खिलाफ पांच मामले दर्ज किए गए हैं।

Web Title : Fadnavis Reveals Kharat's Atrocities: Sexual Assault, Urine Forced Upon Victims.

Web Summary : CM Fadnavis detailed Ashok Kharat's heinous acts in the assembly, including sexual assault under the guise of religious rituals, and forcing victims to drink urine. Five cases have been registered against Kharat based on victim testimonies.