माझ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया, पुढील ५ दिवस भेटता येणार नाही; धनंजय मुंडेंनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:23 IST2025-02-05T16:22:18+5:302025-02-05T16:23:08+5:30
सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

माझ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया, पुढील ५ दिवस भेटता येणार नाही; धनंजय मुंडेंनी दिली माहिती
NCP Dhananjay Munde: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया पार पडली आहे. शस्त्रक्रिया झाल्याने डॉक्टरांनी मुंडे यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून त्यामुळे मी पुढील पाच दिवस भेटू शकणार नाही, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकांना आणि जनतेला दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, "माझ्या डोळ्यावर आज मुंबई येथे पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने सर यांच्या खाजगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी पुढील चार ते पाच दिवस काळजी व विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कृपया मला भेटता येणार नाही. सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल," असं मुंडे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आज बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक शासकीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रम पत्रिकेत प्रॉटोकॉलनुसार मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांचेही नाव होते. मात्र डोळ्यावरील शस्त्रक्रियेमुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही, हे कालच त्यांनी स्पष्ट केले होते.