चाळे करणाऱ्या नेत्याची क्लिप माझ्याकडे होती; एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 06:42 IST2024-09-14T06:42:24+5:302024-09-14T06:42:57+5:30

ती क्लिप कोणत्या पातळीवरील नेत्याची होती, असे विचारले असता जे तुम्हाला नाव माहिती आहेत त्यातीलच एक नाव होते, असे खडसे म्हणाले.

I had several clips, Eknath Khadse again sensational claim about BJP leader | चाळे करणाऱ्या नेत्याची क्लिप माझ्याकडे होती; एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा

चाळे करणाऱ्या नेत्याची क्लिप माझ्याकडे होती; एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा

मुंबई - एका मुलीसोबत चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप मी भाजपच्या वरिष्ठांना दाखवली होती. पण, नंतर मला समजले नाही की, मोबाइलमधील ती क्लिप कशी डिलीट झाली, असे विधान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी केले.

भाजपमध्ये असताना मी भाजपच्या काही वरिष्ठांना ती क्लिप दाखवली होती. दिल्लीच्याही काही नेत्यांना दाखवली होती, असा गौप्यस्फोट खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. ती क्लिप कोणत्या पातळीवरील नेत्याची होती, असे विचारले असता जे तुम्हाला नाव माहिती आहेत त्यातीलच एक नाव होते, असे खडसे म्हणाले.

ज्यांनी तुम्हाला क्लिप पाठवली त्यांच्याकडे ती क्लिप अजूनही असेल का असे विचारले असता ते म्हणाले की, त्यांच्याकडे क्लिप आहे. परंतु, आता त्या व्यक्तीला मॅनेज करण्यात आले. तो माणूस आता त्यांच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल बनवण्याचा शब्द दिला होता असा दावाही खडसे यांनी एका प्रश्नात केला.

Web Title: I had several clips, Eknath Khadse again sensational claim about BJP leader