शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

जातीवरुन माणसाचं मोठेपण ठरत नाही- गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 5:48 PM

जातीपातीच्या राजकारणासाठी येणाऱ्यांना प्रतिसाद देत नसल्याचं गडकरींनी सांगितलं.

नागपूर: माणूस जातीनं मोठा होत नाही. आमच्या पक्षात जातीचं राजकारण चालत नाही. त्यामुळेच नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमध्येही आज आमची सत्ता आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं. मी जात-पात मानत नाही आणि त्यासाठी कोणी माझ्याकडे आलं, तर त्याला प्रतिसादही देत नाही, असंही गडकरींनी स्पष्ट केलं. ते भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. नागपुरातील अनुसूचित समाज कायम भाजपासोबत राहिला. कारण आम्ही जातीचं राजकारण करत नाही, असं गडकरी म्हणाले. भाजपा केवळ उच्च जातीच्या लोकांचा पक्ष असल्याचा भ्रम काँग्रेसनं पसरवला. भाजपामध्ये अस्पृश्यता पाळली जाते, असा अपप्रचार काँग्रेसनं केला. मात्र आम्ही सामाजिक समानता मानतो आणि त्याच धोरणांवर काम करतो. समाजातून जाती प्रथा नष्ट व्हायला हवी. अस्पृश्यता संपायला हवी, असं मला वाटतं. मी कधीही जाती-धर्माचा विचार करत नाही, असंदेखील त्यांनी सांगितलं. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय केल्याचं नितीन गडकरी म्हणाले. 'बाबासाहेबांनी धम्म स्वीकारण्यासाठी नागपूरची निवड केली. त्यांनी भंडारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसनं त्यांच्याविरोधात उमेदवार दिला आणि त्यांचा पराभव केला,' असं गडकरी म्हणाले. काँग्रेसनं बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामातही दिरंगाई केली, असंदेखील ते म्हणाले. 'इंदूमिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न काँग्रेसनं सोडवला नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच तो प्रश्न मार्गी लावला,' असंही गडकरींनी म्हटलं.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाcongressकाँग्रेसnagpurनागपूर