This is the hypocrisy of the left! BJP's harsh criticism on the farmers' agitation to be held tomorrow | ...डाव्यांचा ढोंगीपणा तो हाच! उद्या होणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून भाजपाची खरमरीत टीका 

...डाव्यांचा ढोंगीपणा तो हाच! उद्या होणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून भाजपाची खरमरीत टीका 

पुणे : केंद्र सरकारच्या दुरुस्ती केलेल्या शेतकरी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरूनच सरकार व शेतकरी आमने सामने आले आहेत. त्यामुळे देशभर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वातावरण देखील चांगलेच तापलॆ आहे. त्याच धर्तीवर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या राज्य समितीने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देतानाच गुरुवारी (दि. ३) महाराष्ट्रात आंदोलन छेडणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. मात्र, या निर्णयावरून भाजपाने किसान संघर्ष समन्वय समितीवर खरमरीत शब्दात टीकास्त्र सोडले आहे. 

महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटना आणि मजूर वर्ग, कामगार या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या गुरुवारी होंत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होणार आहे. या दरम्यान भव्य मोर्चे व रास्ता रोकोच्या यांच्या माध्यमातून हे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. याच किसान संघर्ष समन्वय समितीच्या भूमिकेवरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यासंबंधी एक ट्विट करत त्यांच्यावर टीकेची तोफ झोड उठवली आहे.  

केशव उपाध्ये हे ट्विट मध्ये म्हणाले, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, दुधाचे भाव कोसळले, शेती माल खरेदी केंद्र बंद आहेत, यांवर महाराष्ट्रातील सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. तरी ही मंडळी गप्प आहेत. एक शब्दपण काढला नाही. डाव्यांचा ढोंगीपणा तो हाच.. 

याबाबत अजित नवले म्हणाले, केंद्र सरकारने कृषी कायद्यात केलेल्या दुरुस्तीच्या निषेधार्ह सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या संदर्भात जनसंघटनांच्या समन्वय समितीची बैठक विश्वास उटगी यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी तसेच मेधा पाटकर, सुभाष लोमटे यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्या बैठकीत आम्ही सर्वांनी मिळून गुरुवारी (दि. ३०) राज्यभर होत असलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This is the hypocrisy of the left! BJP's harsh criticism on the farmers' agitation to be held tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.