आईवडिलांचा सांभाळ करत नाही म्हणून पतीनं केली पत्नीची गळा आवळून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 12:26 IST2017-08-22T12:23:36+5:302017-08-22T12:26:18+5:30

आईवडिलांचा सांभाळ न करणा-या पत्नीची पतीनं गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगीतील साईनाथ नगर परिसरातील ही घटना आहे.

The husband does not care for the parents, so the spouse has murdered his wife by killing her | आईवडिलांचा सांभाळ करत नाही म्हणून पतीनं केली पत्नीची गळा आवळून हत्या

आईवडिलांचा सांभाळ करत नाही म्हणून पतीनं केली पत्नीची गळा आवळून हत्या

पुणे, दि. 22 - आईवडिलांचा सांभाळ न करणा-या पत्नीची पतीनं गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फुरसुंगीतील साईनाथ नगर परिसरातील ही घटना आहे.  आकाश साईनाथ चव्हाण (वय 23 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. पत्नी आईवडिलांचा सांभाळ करत नाही, घरात छोट्या-मोठ्या कारणावरुन सतत भांडण होत असल्याच्या रागातून आकाशनं पत्नी झोपेत असताना तिची ओढणीनं गळा आवळून हत्या केली.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  विशेष म्हणून पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी आकाश स्वतः पोलिसांसमोर हजर झाला होता. 
पत्नीची ओढणीनं गळा आवळून हत्या केल्यानंतर आकाशानं घराला कुलूप लावले. यानंतर आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला आईवडिलांच्या घरी सोडले. त्यानंतर तो स्वतः पोलिसांसमोर हजर झाला व केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिली.  दरम्यान, आकाशचं लग्न होऊन पाच वर्षे झाली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस हडपसर पोलीस तपास करत आहेत. 
 

Web Title: The husband does not care for the parents, so the spouse has murdered his wife by killing her

टॅग्स :Crimeगुन्हा