शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शिकार बेतली जीवावर

By admin | Updated: May 29, 2015 01:17 IST

आंबे-काजू काढण्यासाठी गेलेले सात-आठ तरुण जंगलात साळींदर दिसताच त्याची शिकार करण्यासाठी ते त्याच्या मागे लागले. साळींदर एका गुहेत शिरला.

देवरुख (जि. रत्नागिरी) : आंबे-काजू काढण्यासाठी गेलेले सात-आठ तरुण जंगलात साळींदर दिसताच त्याची शिकार करण्यासाठी ते त्याच्या मागे लागले. साळींदर एका गुहेत शिरला. त्याच्या पाठोपाठ गुहेत गेलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी-खांबेवाडी येथे घडली. त्यातील एकाने तर यंदाच दहावीची परीक्षा दिली आहे.पंकेश प्रकाश खापरे (१५), विकास भिवा मांडवकर (३०), विलास बाळू पाताडे (३५) अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांसह सात ते आठजण बुधवारी सायंकाळी ४.३०च्या सुमारास भिरकोंड येथे आंबा, काजू काढण्यासाठी गेले होते. आंबे काढता काढता त्यांना तेथे साळिंदर दिसला. या साळिंंदरला मारण्यासाठी सर्वांनी त्याचा पाठलाग केला. खांबेवाडी येथे साळिंदर एका भुयारामध्ये घुसले. त्याला मारण्याचा चंग या तरुणांनी बांधला. साळींदर बाहेर येईल म्हणून सर्वजण रात्रभर भुयाराबाहेर वाट पाहत होते. गुरुवारी पहाटेपर्यंत साळिंदर बाहेर न आल्याने या तरुणांनी भुयारामध्ये जाण्याचे ठरविले.गुरुवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पंकेश खापरे भुयारामध्ये घुसला. बराचवेळ पंकेश बाहेर न आल्याने विकास मांडवकर आत गेला. मात्र, तोही परत न आल्याने विलास पाताडे भुयारामध्ये शिरला. बराचवेळ तिघेही बाहेर न आल्याने अन्य तरुणांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी गावात जाऊन हा प्रकार ग्रामस्थांसमोर कथन केला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरू केली. नंतर तिघांना बाहेर काढून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)