महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 23:41 IST2025-10-01T23:40:57+5:302025-10-01T23:41:47+5:30
Jobs at Maharashtra Government : सर्वाधिक नियुक्त्या कोकण विभागातील असणार आहेत

महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
Jobs at Maharashtra Government : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या ४ ऑक्टोबरला ५,१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. तसेच 'एमपीएससी'द्वारे निवड झालेल्या ५,१२२ उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. या माध्यमातून ऐतिहासिक एकाच दिवशी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली #अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या ४ ऑक्टोबर रोजी ५१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी ५१२२ #एमपीएससी द्वारे…
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 1, 2025
याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे अनुकंपा प्रकरणे मार्गी लागली आहेत. परिणामी येत्या ४ ऑक्टोबरला अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. त्याच दिवशी एमपीएससीतर्फे निवड झालेल्या उमेदवारांनाही प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एकाचवेळी तब्बल १० हजारांहून अधिक उमेदवार शासकीय सेवेत दाखल होणार आहेत. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हाती घेतलेल्या १०० आणि १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या कार्यक्रमातील हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
अनुकंपाधारक उमेदवारांचा अनुशेष संपणार! 5187 उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 1, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लागली असून येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार…
कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा मुलास अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते. परंतु तांत्रिक अडचणी व इतर विलंबामुळे अनेक नियुक्त्या रखडल्या होत्या. ही संवेदनशील बाब ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागाला तातडीच्या सूचना देऊन सातत्याने आढावा घेतला. त्यानंतर नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले आणि त्यामुळेच एकाच दिवशी हजारो उमेदवारांना नियुक्तीपत्रे मिळणार आहेत.
सर्वाधिक नियुक्त्या कोकण विभागात
यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपीक-टंकलेखक श्रेणीतील ५१२२ उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.
विभाग | उमेदवार |
कोकण विभाग | ३०७८ |
विदर्भ विभाग | २५९७ |
पुणे विभाग | १६७४ |
नाशिक विभाग | १२५० |
मराठवाडा विभाग | १७१० |