बारावीचा निकाल लांबणीवर ? शिक्षकांचा बहिष्कार : ६५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:27 AM2018-02-27T03:27:46+5:302018-02-27T03:27:46+5:30

शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने गेल्या सहा दिवसांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे.

 HSC result for postponement? Boycott of teachers: Without scrutiny of 65 lakhs papers | बारावीचा निकाल लांबणीवर ? शिक्षकांचा बहिष्कार : ६५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना

बारावीचा निकाल लांबणीवर ? शिक्षकांचा बहिष्कार : ६५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना

Next

मुंबई : शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने गेल्या सहा दिवसांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे. परिणामी, राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या विविध विषयांच्या तब्बल ६५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून असून त्यामुळे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता विविध शिक्षक संघटनांकडून व्यक्त होत आहे.
शासनादेश निघत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने घेतला आहे. महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले की, आजघडीला शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासलेली नाही. आंदोलन लांबल्यास त्याचा परिणाम बारावीच्या निकालावर होण्याची भीती देशमुख यांनी व्यक्त केली आहे. राज्यात बारावीचे १५ लाख विद्यार्थी आहेत. आणखी दोन दिवस आंदोलन सुरू राहिल्यास ५ जूनपूर्वी बारावीचा निकाल लागणे कठीण होणार आहे.
निकाल वेळेतच लागणार!
मंडळाने शिक्षकांना सहकार्याचे आवाहन केलेले आहे. यासंदर्भातील बैठक मंत्रालयात मंगळवारी, २७ फेब्रुवारी रोजी होईल. त्यात शिक्षकांच्या मागण्यांवर निश्चित तोडगा काढला जाईल. त्यामुळे बारावीच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही.
- डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ
लेखी आश्वासनावर विश्वास नाही!
१५ दिवसांत शासन आदेश काढण्याचे सरकारने दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. त्यामुळे आता शासन आदेश निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. निकालास दिरंगाई झाल्यास शासन जबाबदार असेल.
- प्रा. अनिल देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

Web Title:  HSC result for postponement? Boycott of teachers: Without scrutiny of 65 lakhs papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.