शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीमुक्तीचे सामूहिक धिंडवडे, पाच खोल्यांतील विद्यार्थी बसविले एका हॉलमध्ये, उत्तरांवर टीक मार्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 05:08 IST

कॉपीच्या गैरप्रकाराचा पंचनामा करून तहसीलदारांच्या पथकाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून घेतले.

विकास राऊत / राम शिनगारेलोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : बारावीच्या परीक्षेमध्ये ओहर (जटवाडा) येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रात गुरुवारी जीवशास्त्राचा पेपर देणाऱ्या  १२५ विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून सामूहिक कॉपी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. परीक्षा खोलीला लागूनच संस्था सचिवाच्या कार्यालयात अत्याधुनिक झेरॉक्स मशीनही तहसीलदारांच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आली. 

कॉपीच्या गैरप्रकाराचा पंचनामा करून तहसीलदारांच्या पथकाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून घेतले. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावरील ओहर या गावातील हे इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे केंद्र आहे.   

प्रश्नपत्रिका केल्या जप्तकेंद्राला तहसीलदार रमेश मुंदलोड यांच्या पथकाने दुपारी भेट दिली. तेव्हा पाच खोल्यांतील १२५ विद्यार्थी एका हॉलमध्ये एका बेंचवर दोन असे बसविले होते. परीक्षा  संपल्यानंतर प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्या. तेव्हा सर्वच विद्यार्थ्यांनी बहुपर्यायी प्रश्नांच्या ठरावीक उत्तरांना टीक मार्क केल्याचे आढळून आले.

केबिनमध्ये झेरॉक्स मशिन संस्थाचालकाच्या कॅबिनमध्ये झेरॉक्स मशीन आढळून आले. आत संगणकही सुरू होते. परिसरात सीसीटीव्ही असूनही फुटेज उपलब्ध करून देण्यास संस्थाचालकाने टाळाटाळ केली. याविषयी तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले.  शिक्षण विभागाच्या पथकाने पुढील कार्यवाही केली. 

केंद्र संचालकासह पर्यवेक्षक विनामान्यता परीक्षा केंद्राचे संचालक जी. जे. जाधव हे शिक्षण विभागाकडून मंजुरी घेतलेले शिक्षक नसल्याची बाब समोर आली. त्याचवेळी केंद्रावरील पर्यवेक्षक हे इंग्रजी शाळा, प्राथमिक शाळेवरील शिक्षक असल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे. 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा