इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:46 IST2025-11-15T15:44:58+5:302025-11-15T15:46:04+5:30
Indurikar Maharaj News: साखरपुड्यासाठी नेमकी किती माणसे आली होती, याचा खुलासा इंदुरीकर महाराजांच्या होणाऱ्या जावयानेच केल्याचे म्हटले जात आहे.

इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Indurikar Maharaj News: गेल्या काही दिवसांपासून कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे चांगलेच चर्चेत आहेत. अलीकडेच इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या राजेशाही थाटात पार पडला. याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर सोशल मीडियावरून इंदुरीकर महाराजांचा चांगलेच ट्रोल केले जाऊ लागले. या ट्रोलिंगमुळे व्यथित झालेल्या इंदुरीकर महाराज कीर्तन सोडण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, यातच आता इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यासाठी नेमकी किती माणसे आली होती, याचा खुलासा इंदुरीकर महाराजांच्या होणाऱ्या जावयानेच केल्याचे आता समोर येत आहे.
ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार? लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप या बांधकाम व्यावसायिकासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला. राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेले कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी, बायकांनी धरलेला फेर, राजकीय पुढाऱ्यांची विशेष उपस्थिती चर्चेचा विषय ठरला. या सोशल मीडियावरील ट्रोलर्सना इंदुरीकर महाराजांची चोख उत्तर दिले. यातच आता ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला असून, यामध्ये त्यांनी साखरपुड्याच्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते?
व्हिडीओमध्ये इंदुरीकर महाराजांचे होणारे जावई साहिल चिलप आणि ज्ञानेश्वरी दोघेही दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरूवातीला ज्ञानेश्वरी आणि साहिल सर्वांना हात जोडून नमस्कार करताना दिसत आहेत. नमस्कार आमचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये थाटामाटात पार पडलाय. किमीत कमी तीन ते साडेतीन हजार लोकांचे चांगल्या पद्धतीने नियोजन झाले आहे. आलेल्या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. सगळा कार्यक्रम सुंदरपणे पार पडलेला आहे. आमची जी एंट्री झाली ती सुंदर होती, असे या व्हिडिओत म्हटले आहे.
दरम्यान, साहिल चिलाप हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून, उच्च शिक्षित आहेत. गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे आणि शहरात त्यांनी स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. इंदुरीकर महाराज नेहमी आपल्या कीर्तनातून साधेपणाचे महत्त्व सांगतात, पण या वेळी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या कुटुंबातील आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. लग्न साध्या पद्धतीने करा, असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून देत असतात. परंतु, साखरपुड्याचा थाटमाट पाहून लोकांनी इंदुरीकर महाराजांना ट्रोल केले.