खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 15:48 IST2026-04-05T15:42:16+5:302026-04-05T15:48:15+5:30
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणातील 'कॉल डिटेल रेकॉर्ड' सार्वजनिक झाल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या कॉल डिटेल्सवरुन गंभीर आरोप केले.

खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणातील 'कॉल डिटेल रेकॉर्ड' सार्वजनिक झाल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या कॉल डिटेल्सवरुन गंभीर आरोप केले. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रुपाली चाकणकर यांच्यासोबत खरातचे कॉल डिटेल्स शेअर केले आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, "एका गुन्हेगाराचे सीडीआर बाहेर येणे हे कोणाला तरी जाणीवपूर्वक टार्गेट केले आहे का?" असा सवाल उपस्थित केला आहे.
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, अशोक खरात प्रकरणातील सीडीआर बाहेर आले तेव्हा कोणासाठी लक्षपूर्वक केले आहे का? अंजली दमानिया यांच्याकडे जक कोणी जाणीवपूर्वक पाठवले आहेत का? याची चौकशी केली पाहिजे, असेही शिंदे म्हणाले. अशा प्रकारे सीडीआर जातातच कसे, कोणाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे का?, असा सवालही त्यांनी केला.
साताऱ्यातील राजकारणावरून भाजपावर टीका
सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने लोकशाहीची पायमल्ली केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. "साताऱ्यात सध्या भयानक परिस्थिती आहे, कायद्याची भीती उरलेली नाही. विराज शिंदे यांच्या सौभाग्यवती निवडून आल्या, त्या घराण्याला एक संस्कृती आहे, पण आता ही संस्कृतीच बिघडवायचे काम सुरू आहे," असे ते म्हणाले. मतदानासाठी वेळ वाढवून देण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी आक्षेप नोंदवला असून, या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.