शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील घरांच्या किंमती चढ्याच

By admin | Updated: May 16, 2015 03:21 IST

फ्लॅटवरील व्हॅटचे मूल्यांकन करताना तेथील भूखंडाची रेडी रेकनरनुसार किंमत व प्रत्येक मजल्याचा स्वतंत्र बांधकाम खर्च ग्राह्य धरणाऱ्या राज्य शासनाच्या

अमर मोहिते, मुंबईफ्लॅटवरील व्हॅटचे मूल्यांकन करताना तेथील भूखंडाची रेडी रेकनरनुसार किंमत व प्रत्येक मजल्याचा स्वतंत्र बांधकाम खर्च ग्राह्य धरणाऱ्या राज्य शासनाच्या परिपत्रकावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या पद्धतीनुसार गेल्या वर्षीपासून बिल्डर भरत असलेला व्हॅट यापुढेही त्यांना भरावा लागेल. या परिपत्रकामुळे यापुढेही घरांचे दर हे चढेच राहणार आहेत. याआधी फ्लॅटवरील व्हॅट भूखंडाची किंमत रेडीरेकनर व एफएसआय धरून ठरवला जात होता. तसेच एकूण बांधकाम खर्च यात ग्राह्य धरला जात होता. मात्र गेल्या वर्षी शासनाने नव्याने परिपत्रक काढून भूखंडाच्या किमतीतून रेडीरेकनर व एफएसआय वगळला. तसेच प्रत्येक मजल्याचा स्वतंत्र बांधकाम खर्च ग्राह्य धरला जाईल, असे स्पष्ट केले. पण बिल्डरांना अशा प्रकारे व्हॅटचे मूल्यांकन करणे शक्य नसल्याने त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. यावर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. सुनील देशमुख यांनी हा निकाल दिला आहे. मात्र चुकीच्या मूल्यांकनाने बिल्डरांना अधिक व्हॅट भरावा लागल्यास त्यांनी मूल्यांकन अधिकाऱ्यासमोर भूखंडाची किंमत व बांधकाम खर्चाचा लेखाजोखा ठेवावा. त्यानंतर या दोन्ही तपासणी केल्यावर मूल्यांकन अधिकारी योग्य तो निर्णय देईल आणि बिल्डरांकडून अधिक व्हॅट घेतला गेला असल्यास त्याची अतिरिक्त रक्कम त्यांना परतही मिळेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.शासनाच्या परिपत्रकाविरोधात बिल्डर असोसिएशनने अ‍ॅड. विनायक पाटकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.