हॉटेल, उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये - मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 03:37 AM2021-03-14T03:37:48+5:302021-03-14T06:47:10+5:30

नियम मोडणाऱ्या हॉटेल्स व उपाहारगृहे चालकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी पालिका आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.

Hotels, restaurants should abide by the rules, should not be forced to do strict lockdown - Chief Minister's warning | हॉटेल, उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये - मुख्यमंत्र्यांचा इशारा

हॉटेल, उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये - मुख्यमंत्र्यांचा इशारा

Next

मुंंबई : मोठ्या प्रमाणावरील गर्दी आणि नियम न पाळल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे व कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये. हा शेवटचा इशारा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी स्पष्ट केले. (Hotels, restaurants should abide by the rules, should not be forced to do strict lockdown - Chief Minister's warning)

आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेंटर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले. ‘गेल्या ४ महिन्यांत सर्व व्यवस्थित होते. आपल्याच राज्यात नव्हेतर, अगदी युरोपमध्येसुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखे सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरू झाले होते. मात्र, अचानक सर्वत्र संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

नियम मोडणाऱ्या हॉटेल्स व उपाहारगृहे चालकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी पालिका आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. हॉटेल्स संघटनांनी प्रत्येक प्रभागात त्यांची फिरती पथके तयार करून नियमांचे पालन होते आहे किंवा नाही, ते तपासावे. एक स्टार किंवा दोन स्टार तसेच लहान उपाहारगृहांत नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे, असे मुंबईचे महापालिका आयुक्त आय. एस. चहल म्हणाले.

कोविड मार्शल्स हे मास्क न घालणाऱ्यांना दंड करतील. फूड कोर्टमध्येदेखील संख्या मर्यादित ठेवून, थर्मल इमेजिंग, संपर्काशिवाय पार्किंग याचेदेखील पालन केले जाईल, असा शब्द संघटनांनी दिला. कोरोना सरकला बंगले, सोसायट्यांकडे झोपडपट्ट्यांमधून बंगले, सोसायट्यांकडे कोरोना सरकला आहे. समाजातील या वर्गाचे एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरू झाले आहे; त्यामुळे परिवारातील सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे. नियम न पाळणाऱ्यांकडून अधिक फैलाव होत आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी सावध केले.

Web Title: Hotels, restaurants should abide by the rules, should not be forced to do strict lockdown - Chief Minister's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.