शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

फळबागांना रोगांच्या प्रादुर्भावाचा धोका

By admin | Updated: June 10, 2016 01:36 IST

तापमानातील स्थिरता, आर्द्रतेतील वाढ यामुळे द्राक्ष, डाळिंब बागांवर, बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते

इंदापूर : पूर्वमोसमी पावसास सुरुवात झाल्याने तापमानातील स्थिरता, आर्द्रतेतील वाढ यामुळे द्राक्ष, डाळिंब बागांवर, बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी बुरशीनाशक फवारण्या फळबागांवर करण्याची गरज आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी दिली. या वातावरणात डाळिंबावर तेल्या रोग पडण्याची दाट शक्यता असते. तो रोग येण्याआधीच कॉपर आॅक्सोक्लोराईड किंवा झायमन या बुरशीनाशकाबरोबर स्ट्रेप्टोसायक्लिनची फवारणी करावी. तेल्याचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर अर्धा टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तयार करावे. सद्यस्थितीतील तापमान, आर्द्रतेमुळे द्राक्षावर केवडा, भुरी, करपा, विषाणूजन्य करपा आदी रोगांची शक्यता वाढते. प्रतिबंधात्मक फवारण्या घेणे गरजेचे असते. करपा व केवड्याच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब किंवा कॉपर आॅक्सिक्लोराईडची फवारणी घेणे आवश्यक असते. जिवाणूजन्य करप्यासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशकाबरोबर स्ट्रेप्टोसायक्लिन फवारावे. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्साकोन झोल किंवा सल्फरची फवारणी करावी. द्राक्षाची काडी पक्व झाली असल्यास बोर्डो मिश्रण अर्धा ते एक टक्क्यांपर्यंत फवारले तरी चालेल, पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी जैविक उत्पादने सकाळी दहा वाजण्याच्या आत किंवा सायंकाळी पाचनंतर देणे महत्त्वाचे आहे. ती ताजी बनवलेली व नामांकित कंपनीची असावीत, असे त्यांनी सांगितले.पूर्वहंगामी पावसामुळे तापमान २६ अंश सेल्सिअस ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहते. आर्द्रतेमध्ये वाढ होते. त्यामुळे द्राक्ष व डाळिंब बागांवर वेगवेगळे बुरशीजन्य व विषाणूजन्य रोग होण्याची शक्यता असते. कृषी विद्यापीठे, राष्ट्रीय द्राक्ष व डाळिंब संशोधन केंद्रांच्या शिफारशीनुसार योग्य त्याच कीटकनाशके, बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्यास रोग आटोक्यात येतील. - राजेंद्र वाघमोडे, संचालक