शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

राज्यातील ३८ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन थकित!, दिवाळी सण साजरा कसा करायचा हा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:09 IST

सातारा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. राज्यातील अशा कर्मचाऱ्यांची संख्या ...

सातारा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. राज्यातील अशा कर्मचाऱ्यांची संख्या ३८ हजारांवर आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणावर दु:खाचे सावट निर्माण झालेले आहे. त्याचबरोबर थकित मानधनासाठी तातडीने जिल्हास्तरावर अखर्चित असणारा १५ वा वित्त आयोगाचा निधी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेकडून आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकता संघाच्या वतीने मागील आठवड्यातच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन ई स्पर्श संगणक प्रणाली कार्यरत करण्याची कार्यवाही राज्यस्तरावरून सुरू करण्यात आलेली आहे. मात्र, ही संगणक प्रणाली दिवाळीपर्यंत कार्यान्वित होणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यातच या अभियानांतर्गत राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे मानधन थकित आहे. हे मानधन दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यातच प्रत्येक जिल्ह्यात १५ वा वित्त आयोगाचा पुरेसा निधी शिल्लक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे दिवाळी सण, बँक कर्ज हप्ते, दैनंदिन घरगुती तसेच शैक्षणिक खर्चही आहे. हे विचारात घेऊन कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी तातडीने १५ वा वित्त आयोग निधी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे मानधन थकित आहे. राज्यातील ३८ हजारांवर कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे. दिवाळी सण साजरा करणे, बँकांचे कर्ज हप्ते भरणे आदींसह विविध कारणांसाठी हे मानधन तातडीने मिळणे गरजेचे आहे. त्यातच ई स्पर्श प्रणालीतील तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे मानधन मिळेल असे वाटत नाही. यासाठी १५ वा वित्त आयोगाचा निधी पुरेसा शिल्लक आहे. तो वापरण्यास परवानगी देण्याची आवश्यकता आहे. - विजय गायकवाड, राज्याध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकता संघ

English
हिंदी सारांश
Web Title : 38,000 Maharashtra health workers unpaid, Diwali uncertain amid delayed salaries.

Web Summary : 38,000 National Health Mission contract workers in Maharashtra haven't received salaries for two months, casting a shadow over Diwali. The union has requested the health minister to allow the use of the 15th Finance Commission funds for immediate disbursement, citing technical issues with the new payment system and financial burdens faced by employees.