शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’च्या गणपतीला मानाचे पान

By admin | Updated: September 5, 2016 01:15 IST

‘लोकमत’ने नेहमीच विचारांचा जागर करताना त्याला कृतिशीलतेचीही जोड दिली आहे.

पुणे : ‘लोकमत’ने नेहमीच विचारांचा जागर करताना त्याला कृतिशीलतेचीही जोड दिली आहे. महिलाशक्तीला सन्मान देण्यासाठी ‘ती’चा गणपती या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. महिला शक्तीचे दर्शन घडविणाऱ्या या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे़‘लोकमत’ने पुरोगामित्वाच्या भूमिकेला बळ देतानाच सामाजिक, सांस्कृतिक भान ठेवले आहे. समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याच्या भूमिकेतून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला; मात्र महिलांच्या रूपाने अर्धे जग त्यापासून वंचित होते. भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीला आदिशक्ती म्हटले जात असले, तरी पुरुषप्रधान संस्कृतीने गणेशोत्सवासारख्या उपक्रमांवर आपले वर्चस्व ठेवले होते. ‘लोकमत सखी मंच’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाने गणेशोत्सव आणखी समाजाभिमुख होऊन लोकमान्यांच्या परंपरेतील पुढचे पाऊल पडले. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते करतानाच महिलांच्या विचाराला व्यासपीठ देणारी ‘ती’चा गणपती हीदेखील एक चळवळ बनली़ पुण्याच्या सर्व क्षेत्रातील महिला गेली दोन वर्षे ‘ती’चा गणपतीला आवर्जून भेट देत आहेत़कृती, निर्मिती आणि संस्कृतीच्या माध्यमातून उत्सव सर्जनशील आणि कृतिशील व्हावा, यासाठी ‘लोकमत’तर्फे आपले बाप्पा संकल्पनेच्या आधारावर गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यात सर्वच ठिकाणी सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशाची आराधना केली जाते, यामध्ये पुरुषांचाच मोठ्या प्रमाणात समावेश असतो; मात्र ‘लोकमत’ने या परंपरेत भर टाकत महिलांचे मंडळ स्थापन केले असून, मागील दोन वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. शिक्षण आणि संस्कृतीचा ऐतिहासिक परंपरेचा वसा पुढे नेत पुणे शहरात ‘ती’चा गणपती हा उपक्रम साजरा केला जात आहे. त्यामुळे शहरातील जास्तीत महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे. हर्षिता सुदान या लोकमत ‘ती’चा गणपती मंडळाच्या अध्यक्षा असून, अमृता हर्षे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. महिलांनी महिलांसाठी चालविलेले मंडळ, अशी या उपक्रमाची विशेष ओळख असून, शहरातील सर्व सार्वजनिक मंडळांनीही महिलांना आरतीचा मान द्यावा, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे. अशा मंडळांच्या कार्याची दखल घेण्यात येणार असून, मंडळांनी महिलांच्या हस्ते केलेल्या आरतीचे फोटो ंंस्र’ीुंस्रस्रं16@ॅें्र’.ूङ्मे या मेल आयडीवर पाठवावेत.या उपक्रमाचे सहप्रायोजक रंगवर्षा सारिज, आयवोना स्पा, ब्यूटी पार्टनर आयएसएएस, हेल्थ पार्टनर बिक्रम योगा, फिटनेस पार्टनर फिटनेस मंत्राज् जिम, मार्केटयार्ड, नॉलेज पार्टनर अ‍ॅपटेक कॉम्प्युटर एज्युकेशन बॅँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स अ‍ॅकॅडमी, डेक्कन पुणे आहेत.>४‘सेल्फी विथ बाप्पा’ हा अनोखा उपक्रम गणेशोत्सव कालावधीत ‘लोकमत’तर्फे राबविण्यात येत आहे. यामध्ये आपल्या घरातील गणपतीबरोबर काढलेला सेल्फी नागरिकांनी ‘लोकमत’च्या ९०११०२९१८१ क्रमांकावर पाठवायचा आहे. ‘लोकमत’कडे आलेल्या छायाचित्रांतील निवडक छायाचित्रांना प्रसिद्धी देण्यात येणार आहे.>स्पर्धांत बक्षिसे जिंकण्याची संधी गौरी-गणेश आरास स्पर्धा, इको-फ्रेंडली आरास स्पर्धा; तसेच मोदक स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे. यामध्ये जिंकून येणाऱ्यांना ‘लोकमत’तर्फे आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.