शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

घरातलं राजकारण रंगणार!

By admin | Updated: September 30, 2014 02:35 IST

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांची चांगलीच राजकीय पंचाईत झाली आहे. मोठा मुलगा आशिष नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये भाजपाचा उमेदवार आहे,

यदु जोशी - मुंबई
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांची चांगलीच राजकीय पंचाईत झाली आहे. मोठा मुलगा आशिष नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये भाजपाचा उमेदवार आहे, तर लहान डॉक्टर मुलगा अमोल रामटकेमधून राष्ट्रवादीकडून लढतोय!
आशिष यांनी गेल्यावेळी सावनेरमधून भाजपातर्फे निवडणूक लढविली आणि ते काँग्रेसचे सुनील केदार यांच्याकडून कमी फरकाने हरले होते. यावेळी त्यांनी पुन्हा पक्षाकडे सावनेरसाठी उमेदवारी मागितली पण पक्षाने त्यांना काटोलमध्ये पाठविले. 
विशेष म्हणजे काटोलमध्ये त्यांचा सामना काका माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याशी आहे. अनिल देशमुख 1995 पासून काटोलचे आमदार आहेत आणि दहा महिन्यांचा अपवाद वगळता मंत्रीही राहिले. 
रामटेकची जागा आघाडीमध्ये काँग्रेसच्या कोटय़ात होती. डॉ.अमोल हे काँग्रेसच्या तिकिटाचे दावेदार होते पण तेथे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना उमेदवारी मिळाली. म्हणून अमोल यांना माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि अनिल देशमुख यांनी एकत्र बसून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. आता अनिल देशमुख यांना अमोल यांच्या प्रचारासाठी रामटेकला जावे लागणार आहे.  रणजित देशमुख यांचे बोट धरून अनिल देशमुख राजकारणात आले. वडविहिरा, काटोल आणि नागपूरमध्ये दोघांची घरे ही भिंतीला भिंत लागून आहेत. रणजित देशमुख यांची राजकीय कारकिर्द काटोलमधूनच बहरली. पुढे ते सावनेरला गेले. इकडे अनिल देशमुखांनी काटोल काबीज केले. सूत्रंनी सांगितले की रणजित देशमुख यांनी यावेळी काटोलमधून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण आधी तुमच्या मुलाला भाजपामधून काँग्रेसमध्ये आणा, अशी अट काँग्रेसने घातली होती. मुलगा माङो ऐकणार नाही, असे त्यांनी पक्षाला सांगितल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला.  
 
 मी काँग्रेसमध्ये असलो तरी काँग्रेसचा प्रचार करणार नाही. पक्षाने माझी उपेक्षाच केली आहे. माङयासमोर धर्मसंकट आहे त्यामुळे मी  दोन्ही मुलांचा प्रचार करेल. दोघांच्याही राजकीय भवितव्याची मला चिंता आहे.  
-रणजित देशमुख,                                         काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष
 
भाजपाने माङयाविरुद्ध कुटुंबातील सदस्याला उभे करून घरात राजकारण आणले.मी आशिष किंवा रणजितबाबूंवर वैयक्तिक टीका करणार नाही. 
- अनिल देशमुख, माजी मंत्री.
 
रणजित देशमुख यांनी यावेळी काटोलमधून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण आधी तुमच्या मुलाला भाजपामधून काँग्रेसमध्ये आणा, अशी अट काँग्रेसने घातली होती.