शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोना गो'चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा; अनिल देशमुखांकडून आठवलेंना सदिच्छा! 

By ravalnath.patil | Updated: October 28, 2020 19:48 IST

Anil Deshmukh : सध्या रामदास आठवले यांची प्रकृती ठीक आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात ते दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही रामदास आठवले यांच्याच खास स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : कोरोना व्हायरस विरोधात 'गो कोरोना, कोरोना गो' अशी घोषणा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी रामदास आठवले यांनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, रामदास आठवले लवकर कोरोनामुक्त व्हावेत, यासाठी त्याचे अनेक मित्र, शुभचिंतक त्यांना शुभेच्छा देत आहेत.

रामदास आठवले हे कुठल्याही राजकीय परिस्थितीवर कवितेतून भाष्य करण्याबाबत प्रसिद्ध आहेत. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही रामदास आठवले यांच्याच खास स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल देशमुखांनी आठवलेंना चारोळीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. "कोरोना-गोचा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा llधीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका,कोरोनात नाही दम इतका, जो तुम्हा लावील धक्का ll रामदास आठवले लवकर बरे व्हा." असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान, सध्या रामदास आठवले यांची प्रकृती ठीक आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात ते दाखल झाले आहेत. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. याशिवाय,रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे रिपाइंच्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

आठवलेंच्या उपस्थित पायल घोषचा पक्षप्रवेशदिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोषने गेल्या सोमवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात पायलने रिपाइंचा झेंडा हाती घेतला असून पक्षाचे संघटना वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे. रामदास आठवले यांनी पक्षाच्या महिला उपाध्यक्षपदी पायल घोषची नेमणूक केली आहे.

राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री अनिल परब,  कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखRamdas Athawaleरामदास आठवलेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस