शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

लॉकडाऊनचा फटका; मुंबई, पुण्यातील ५६ टक्के तयार घरांना ग्राहकांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 04:55 IST

जून महिन्याच्या अखेरीस मुंबई, पुण्यात बांधकाम पूर्ण झालेली आणि वापर परवाना मिळालेली अनुक्रमे  २,७६,४९२ आणि १,३५,१२४ अशी ४ लाख ११,६१६ घरे विक्रीसाठी तयार होती. त्यानंतरच्या तीन महिन्यांत विक्रीच्या तुलनेत नव्या घरांची संख्या कमी होती. (houses in Mumbai, Pune)

मुंबई : जुलै ते ऑगस्ट या तिमाहीत घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढू लागले असले तरी आजही देशातील सात प्रमुख शहरांमध्ये तब्बल ७ लाख २३ हजार तयार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे यापैकी ५६ टक्के म्हणजेच ४ लाखांपेक्षा जास्त घरे ही मुंबई महानगर आणि पुण्यातील आहेत.

जून महिन्याच्या अखेरीस मुंबई, पुण्यात बांधकाम पूर्ण झालेली आणि वापर परवाना मिळालेली अनुक्रमे  २,७६,४९२ आणि १,३५,१२४ अशी ४ लाख ११,६१६ घरे विक्रीसाठी तयार होती. त्यानंतरच्या तीन महिन्यांत विक्रीच्या तुलनेत नव्या घरांची संख्या कमी होती. त्यामुळे विक्रीच्या प्रतीक्षेतील घरांची संख्या ४,०४,८८० इतकी कमी झाली. दिल्लीत १५ टक्के म्हणजेच १ लाख ८ हजार आणि बंगळुरू येथील सुमारे ७२ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध असून या घरांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात एप्रिल ते जून या तिमाहीत या सात शहरांमघ्ये जेमतेम ५,३८२ घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ती संख्या ८५ टक्क्यांनी वाढून ३५,१३२ पर्यंत पोहोचली. त्यात सर्वाधिक वाटा सप्टेंबरमधील खरेदीचा आहे. विक्रीसाठी लागणार ४३ महिने - सप्टेंबर, २०१९ मध्ये विक्रीच्या प्रतीक्षेतील घरांची संख्या यंदाच्या तुलनेत कमी होती. घरांच्या विक्रीची जी गती त्या वेळी होती त्यानुसार शिल्लक घरांच्या विक्रीसाठी सुमारे २३ महिने लागतील असा अंदाज होता. मात्र, यंदा घरांच्या संख्येतही वाढ झाली असून त्यांच्या विक्रीची गतीही मंदावली. त्यामुळे या ७ लाख घरांच्या विक्रीसाठी किमान ४३ महिने लागतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्जांनी वर्तवला. 

टॅग्स :HomeघरPuneपुणेMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या